चॅम्पियनशिप गाजवणाऱ्या पाक कर्णधाराला बूट उचलायला लावणे अख्तरला खटकलं

सुशांत जाधव
Friday, 7 August 2020

 पाक व्यवस्थापनाने त्याच्याकडून जे काम करुन घेतले ते त्याचा अपमान करणारे आहे, असा उल्लेखही अख्तरने केलाय. राशिद लतीफनेही या मुद्यावरुन पाकिस्तानी संघात ऐकीची कमी असल्याचे जाणवते असे म्हटले आहे.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी सरफराज अहमद 12 व्या खेळाडूच्या रुपात दिसला. पाक व्यवस्थापनाच्या या निर्णयावर माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने आक्षेप घेतलाय. पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळातील पाकच्या डावातील 71 व्या षटकात सरफराज शादाब खानसाठी ड्रिंक आणि शूज घेऊन आला होता. ज्या कर्णधाराने पाकिस्तानला 2017 मध्ये चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकून दिली त्या कर्णधाराला अशा प्रकारे वागणूक देणे योग्य नाही, असे शोएब अख्तरने म्हटले आहे.

EngVsPak : सलामीवीर शान मसूदच्या शतकी खेळीने पाकिस्तान मजबूत स्थितीत

 पाक व्यवस्थापनाने त्याच्याकडून जे काम करुन घेतले ते त्याचा अपमान करणारे आहे, असा उल्लेखही अख्तरने केलाय. राशिद लतीफनेही या मुद्यावरुन पाकिस्तानी संघात ऐकीची कमी असल्याचे जाणवते असे म्हटले आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारे खेळाडू संघाच्या गणवेशात दिसले नाही. ते ट्रॅकसूट घालून बसले होते. संघात ऐकीची भावना नसल्याचेच हे चित्र असल्याचे लतीफने म्हटले आहे. ज्याने चार वर्षे पाकिस्तानी संघाचे नेतृत्व केले त्या व्यक्तीला तुम्ही अशा प्रकारची वागणूक कशी देऊ शकता? ज्या कर्णधाराने पाकिस्तानला चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकून दिली त्याला तुम्ही बूट उचलायला लावले. 

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

सरफराजने स्वत:हून ही गोष्ट केली असली तरी त्याला रोखायला हवे होते. वसीम आक्रम माझ्यासाठी कधी बूट घेऊन आले नव्हते, अशा शब्दांत शोएबने पाक व्यवस्थापनासह युवा खेळाडूंना फटकारले आहे.  बूट घेऊन जाणे चुकीची गोष्ट नाही पण माजी कर्णधाराकडून अशी गोष्ट करुन घेणे अशोभनीय आहे. सरफराज अहमदचा संघात वजन नाही. त्यामुळेच मिकी आर्थर त्याच्यावर नियंत्रण ठेवायचे, असा दावाही शोएबने यावेळी केलाय. 


​ ​

संबंधित बातम्या