विराटनं संघातून वगळलं अन् याने चौकार षटकार बरसवत शतक ठोकलं

वृत्तसंस्था
Friday, 11 October 2019

प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यानंतर शिवम दुबेने एकाकी किल्ला लढवला. चौकार, षटकारांची तुफानी बरसात करत शतकी खेळी साकार केली. परंतु, मुंबईला कर्नाटकविरुद्ध विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अवघ्या 10 धावांनी हार स्वीकारावी लागली. 

Vijay Hazare Trophy : बंगळूर : प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यानंतर शिवम दुबेने एकाकी किल्ला लढवला. चौकार, षटकारांची तुफानी बरसात करत शतकी खेळी साकार केली. परंतु, मुंबईला कर्नाटकविरुद्ध विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अवघ्या 10 धावांनी हार स्वीकारावी लागली. 

INDvsSA : त्याचं नेहमीचंय, मला डिवचायला आवडतं त्याला! : पुजारा

एकीकडे केएल राहुल, मनीष पांडे, करुण नायर, अभिमन्यू मिथून; तर दुसरीकडे श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, धवल कुलकर्णी आणि शार्दुल ठाकूर असे नावाजलेले खेळाडू असणारा हा सामना तेवढाच चुरशीचा झाला.

कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 312 धावा केल्या. त्यासमोर मुंबईची 6 बाद 169 अशी अवस्था झाली असताना दुबेने सात चौकार, 10 षटकारांसह 67 चेंडूंत 118 धावांचा झंझावात सादर केला. अखेर 12 चेंडूत 10 धावांची गरज असताना मुंबईचा लढा संपला. 

त्रिशतकी धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला भक्कम सलामीची गरज होती; परंतु दोन दिवसांपूर्वी शतकी खेळी करणारा यशस्वी जैसवाल आणि आदित्य तरे जम बसत असतानाच बाद झाले. पाठोपाठ सिद्धेश लाड, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांनीही निराशा केली. 

शिवम दुबे एका बाजूने कलाटणी देणारी शतकी खेळी साकारत असताना दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळत नव्हती. शिवम आणि त्यानंतर शार्दुल बाद झाल्यावर धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे या अखेरच्या जोडीने 15 धावांची भागीदारी करून चुरस कायम ठेवली होती. 

Happy Birthday Hardik : उधारीवर क्रिकेट किट घेऊन घडला हार्दिक पंड्या

गौतमची कामगिरी निर्णायक 
अष्टपैलू गुणवत्ता असलेल्या कर्नाटकच्या गौतमची कामगिरी दोन्ही संघातील फरक निश्‍चित करणारी ठरली. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 13 चेंडूत 22 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीत तरे, लाड आणि सूर्यकुमार या मुंबईच्या तीन खंद्या फलंदाजांना बाद केले. त्या अगोदर केएल राहुल आणि मनीष पांडे यांनी अर्धशतकी खेळी केली; तर देवदत्त पदिक्कलने 79 धावांचे योगदान दिले. मुंबईकडून तुषार देशपांडे पुन्हा एकदा महागडा ठरला. 

संक्षिप्त धावफलक : कर्नाटक : 50 षटकांत 7 बाद 312 (केएल राहुल 58-57 चेंडू, 9 चौकार, देवदत्त पदिक्कल 79-85 चेंडू, 10 चौकार, 1 षटकार, मनीष पांडे 62-64 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार, बीआर शरथ 28, गौतम नाबाद 22-13 चेंडू, 2 चौकार, धवल कुलकर्णी 44-1, शार्दुल ठाकूर 54-1, तुषार देशपांडे 71-0) वि. वि. मुंबई ः 48.1 षटकांत सर्वबाद 303 (यशस्वी जैसवाल 22, आदित्य तरे 32, सिद्धेश लाड 34-29 चेंडू, 2 चौकार, 2 षटकार, श्रेयस अय्यर 11, सूर्यकुमार यादव 26, शिवम दुबे 118-67 चेंडू, 7 चौकार, 10 षटकार, शार्दुल ठाकूर 26, अभिमन्यू मिथून 40-3, प्रसिद्ध कृष्णा 39-2, गौतम 51-3)


​ ​

संबंधित बातम्या