World Cup 2019 : भारताला 'शिखर' धक्का, धवन तीन आठवडयांसाठी संघाबाहेर

वृत्तसंस्था
Tuesday, 11 June 2019

भारताचा सलामीवीर गब्बर म्हणजेच शिखर धवन याच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो तब्बल तीन आठवडे संघाच्या बाहेर गेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुदध झालेल्या सामन्यात शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताचा सलामीवीर गब्बर म्हणजेच शिखर धवन याच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो तब्बल तीन आठवडे संघाच्या बाहेर गेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुदध झालेल्या सामन्यात शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. 

त्याच्या अंगठ्यावर अजूनही सूज कायम होती त्यामुळे आज त्याच्या अंगठ्याचे स्कॅनिंग करण्यात आले. त्यानंतर तो संघात खेळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नेथन कुल्टर नाईलचा एक उसळता चेंडू त्याच्या अंगठ्यावर आदळला होता. त्याला वेदना होत होत्या. मात्र, शिखर धवनने वेदन सहन करतच शतकी खेळी केली होती. या शतकी खेळीनंतर धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. 

त्याच्या अंगठ्यावरील सूज अजून कायम असल्यामुळे काळजीसाठी भारतीय संघाचे फिजियो पॅट्रिक फरहात यांनी स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेतला होता. भारताचा पुढील सामना गुरुवारी (ता. 13) न्यूझीलंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे होणार आहे. धवनच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल आता सलामीला खेळण्याची शक्यता आहे तर विजय शंकरला संघात स्थान दिले जाऊ शकते. 


​ ​

संबंधित बातम्या