INDvsWI : आता शिखरला खेळावंच लागेल नाही तर...

वृत्तसंस्था
Tuesday, 13 August 2019

विंडीज दौऱ्याला सुरवात झाल्यापासून भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन याला अजून सूर गवसलेला नाही. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना उद्या होत असताना निश्‍चितच त्याच्यावर कामगिरी उंचावण्याचे दडपण असेल. 

पोर्ट ऑफ स्पेन : विंडीज दौऱ्याला सुरवात झाल्यापासून भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन याला अजून सूर गवसलेला नाही. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना उद्या होत असताना निश्‍चितच त्याच्यावर कामगिरी उंचावण्याचे दडपण असेल. 

टी 20 सामन्यांच्या मालिकेतही धवन फार काही चमक दाखवू शकलेला नाही. एकदिवसीय सामन्यातही तो अपयशी ठरला आहे. धवनचा कसोटी क्रिकेटसाठी संघात समावेश नाही. त्यामुळे विंडीज दौऱ्याची अखेर चांगली करण्यासाठी तो उत्सुक असेल. पण, त्यासाठी त्याला आपला खेळ उंचवावा लागेल. त्याचवेळी चौथ्या क्रमांकाचे दडपण घेण्यावरून रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यातील स्पर्धा कायम असेल. संघ व्यवस्थापनाचा पंतला पाठिंबा मिळतोय, पण तो काही केल्या पात्र ठरत नाहीये. दुसरीकडे श्रेयस अय्यरने आपल्या खेळीने अपेक्षा उंचावल्या आहेत. खेळपट्टीवर आवश्‍यक असणाऱ्या संयमाची अभाव हीच पंतची उणिव समोर आली आहे, तर तीच अय्यरची ताकद ठरली आहे. 

या दोन गोष्टी वगळल्यास रोहित शर्मा, विराट कोहली, केदार जाधव अशी बारताची फलंदाजी तगडी दिसत आहे. गोलंदाजीमद्ये भुवनेश्‍वरने आपली छाप पाडली आहे. महंमद शमी आणि कुलदीप यादवची साथ त्यांना मिळाली. यानंतरही अखेरच्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन शमीच्या जागी नवदीप सैनीच्या समावेशाचा विचार करू शकते. 

दुसरीकडे विंडी संघ मालिका वाचविण्याचा जरूर प्रयत्न करेल. पण, यासाठी त्यांच्या फलंदाजांनी मोठी जबाबदारी घेणे आवश्‍यक आहे. ख्रिस गेल, शय होप, शिमरन हेटमेर, एविन लुईस, निकोलस पूरन असे आक्रमक फलंदाज त्यांच्याकडे आहेत. पण, त्यांना आपल्या लौकिकाला साजेसा खेळ दाखवता आलेला नाही. रोस्टन चेस, जेसन होल्डन, शेल्डन कॉट्रेल या गोलंदाजांना त्यांच्या फलंदाजांकडून पूरक साथ मिळाल्यास अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ते भारतासमोर आव्हान उभे करू शकतात.


​ ​

संबंधित बातम्या