धवनचे ट्विट अन् सोशल मिडीयात ट्रोल

वृत्तसंस्था
Monday, 30 July 2018

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शिखर धवनने विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारासोबत स्लिपमधला फोटो शेअर केला. ''केसे ना हो गुजारा... जब साथ हो कोहली और पुजारा'' असे ट्विट करत त्याने फोटो शेअर केला आहे. परंतू या फोटोनंतर सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले.

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर शिखर धवन याला एसेक्सविरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावांमध्ये धावा करण्यात अपयश आले. दोन्ही डावांमध्ये तो पहिल्याच षटकांत बाद झाला होता. पहिल्या डावामध्ये तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला तर दुसऱ्या डावात तो तिसऱ्या चेंडूवर बाद झाला होता. 

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शिखर धवनने विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारासोबत स्लिपमधला फोटो शेअर केला. ''केसे ना हो गुजारा... जब साथ हो कोहली और पुजारा'' असे ट्विट करत त्याने फोटो शेअर केला आहे. परंतू या फोटोनंतर सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला एक ऑगस्टला एजबस्टन येथे होणार आहे. 

संबंधित बातम्या