#INDvsENG हार्दिकने एकाच पैलूवर लक्ष क्रेंदीत करावे : शॉन पोलॉक

वृत्तसंस्था
Saturday, 11 August 2018

ट्वेंटी-20 क्रिकेटच्या उद्रेकामुळे जागतिक क्रिकेटमध्ये अनेक अष्टपैलू खेळाडूंचे वर्चस्व उदयास आले आहे, तरीही त्यांच्यामते इंग्लंडचा बेन स्टोक्स हा सध्या क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. असे मत पोलॉक यांनी व्यक्त केले. पोलॉकने 24 वर्षीय पंड्याला आपल्या खेळाचा एक पैलू (फलंदाजी किंवा गोलंदाजी करणे) समजावून घेण्याचा सल्ला दिला आहे.

लंडन : भारतीय क्रिकेट संघात नियमित होण्याआधी अष्टपैलू हार्दिक पंड्या ताकदीने बळकट झाला आहे, पण दक्षिण आफ्रिकेच्या माजू अष्टपैलू शॉन पोलॉकने बडोदा स्टार क्रिकेटपटूला दीर्घकाळ खेळण्याची इच्छा असेल तर खेळाच्या एकाच पैलूवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे मत मांडले आहे. 

ट्वेंटी-20 क्रिकेटच्या उद्रेकामुळे जागतिक क्रिकेटमध्ये अनेक अष्टपैलू खेळाडूंचे वर्चस्व उदयास आले आहे, तरीही त्यांच्यामते इंग्लंडचा बेन स्टोक्स हा सध्या क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. असे मत पोलॉक यांनी व्यक्त केले. पोलॉकने 24 वर्षीय पंड्याला आपल्या खेळाचा एक पैलू (फलंदाजी किंवा गोलंदाजी करणे) समजावून घेण्याचा सल्ला दिला आहे.

"ट्वेंटी20 क्रिकेटमुळे भरपूर लोकांना हे जाणवलं आहे की त्यांच्यात बॅट आणि बॉल यांच्यात योगदान देण्याची क्षमता आहे. जगभरातील अष्टपैलूंच्या तुलनेत एक निवडणे अवघड आहे पण बेन स्टोक्सचा विचार मी करू शकतो. सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे," असे मत पोलॉक यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या