शास्त्रींचे वरातीमागून घोडे; ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हवा अधिक सराव

वृत्तसंस्था
Saturday, 15 September 2018

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यात झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर भारताचे मार्गदर्शक रवी शास्त्री आणि संघ व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जास्त सराव सामने खेळण्याची मागणी केली आहे. 

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यात झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर भारताचे मार्गदर्शक रवी शास्त्री आणि संघ व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जास्त सराव सामने खेळण्याची मागणी केली आहे. 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, ''भारताच्या इंग्लंड दौऱ्याकडे पाहिले तर दुसऱ्या सामन्यानंतर भारतीय संघाने प्रत्येक सामन्यात प्रगती केली आहे. कमकुवत संघाविरुद्धसुद्धा दोन तीन सामने खेळायला मिळाले तर काही हरकत नाही. मात्र, व्यग्र वेळापत्रकामुळे हे शक्य होत नाही.''
''ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मात्र आम्ही जास्त सराव सामने खेळण्याची मागणी केली आहे. मात्र, हे सराव सामने खेळण्यासाठी वेळ आहे का हा मूळ प्रश्न आहे.''

इंग्लंड दौऱ्यात झालेल्या पराभवातून सकारत्मक गोष्टी घेत असल्याचे सांगत ते म्हणाले, ''इंग्ंड दौऱ्यातून अनेक सकारात्मक गोष्टी सोबत घेऊन भारतीय संघ परतला आहे. भारतीय संघ अगदी योग्य दिशेने चालला आहे. चाहत्यांना प्रतिक्रिया देण्याचा अधिकार आहे. मात्र, खेळाडू शंभर ट्क्के प्रयत्न करत आहेत, प्रत्येक खेळाडू खेळाशी प्रामाणिक आहे आणि त्यामुळेच लोकं काय म्हणातात याचा आम्ही विचार करत नाही.''

संबंधित बातम्या