ICC मध्ये मोठा बदल; शशांक मनोहर यांनी दिला अध्यक्षपदाचा राजीनामा

टीम ई-सकाळ
Wednesday, 1 July 2020

शशांक मनोहर हे मागील दोन वर्षांपासून अध्यक्षपदावर होते. आयसीसीच्या नियमावलीनुसार, अध्यक्षपदी तीन वर्ष कारभार पाहणे शक्य आहे. यानुसार ते आणखी एक वर्ष या पदावर विराजमान राहू शकले असते. पण

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी यापूर्वीच नकार देणाऱ्या शशांक मनोहर यांनी बुधवारी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी इमरान ख्वाजा यांच्याकडे आली आहे. आयसीसीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रानुसार आयसीसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपर्यंत ते हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहतील. शशांक मनोहर हे मागील दोन वर्षांपासून अध्यक्षपदावर होते. आयसीसीच्या नियमावलीनुसार, अध्यक्षपदी तीन वर्ष कारभार पाहणे शक्य आहे. यानुसार ते आणखी एक वर्ष या पदावर विराजमान राहू शकले असते. पण त्यांनी पदमुक्त होण्याचा मार्ग निवडला. 

भारतीय संघाच्या नेतृत्वासाठी रोहित शर्मा रेडीमेड ऑप्शन

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे प्रमुख कॉलिन ग्रावेस (Colin Graves) त्यांची जागेसाठी प्रबळ दावेदार आहेत. उपाध्यक्षपदावर असलेले हाँगकाँगचे इमरान ख्वाजा देखील आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मात्र त्यांना पूर्णकालीन सदस्यत्वासाठी समर्थन नाही. क्रिकेटच्या मैदानात कसोटीची मान्यता असणाऱ्या सर्व देशातील क्रिकेट संघटनांचा कॉलिन यांना पाठिंबा असल्यामुळे आगामी अध्यक्ष ते असतील हे जवळपास पक्के आहे.

2011 वर्ल्डकप फिक्सिंग प्रकरण: डी सिल्वाची कसून चौकशी, आता उपुल थरंगाचा नंबर ?

इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या क्रिकेट मंडळांचा  कॉलिन ग्रावेस यांना पाठिंबा आहे. त्यांचे भारतीय क्रिकेट मंडळाशीही चांगले संबध आहेत. मात्र बीसीसीआयने खुलेपणाने त्यांना समर्थन दिलेले नाही. एन. श्रीनिवासन यांच्या काळात शशांक मनोहर यांनी भारतीय क्रिकेटच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे शशांक मनोहर यांच्यापेक्षा कॉलिन ग्रोवेस यांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयला अधिक फायदेशीर ठरेल, असेही मानले जाते. 

 


​ ​

संबंधित बातम्या