मनोहर दूर झाल्याने आयपीएलचा मार्ग सुकर?

टीम ई-सकाळ
Wednesday, 1 July 2020

नव्या अध्यक्षांच्या निवडीपूर्वीच मनोहर दूर झाल्यामुळे तो भारतीय क्रिकेट मंडळाचा विजय मानला जात आहे.

मुंबई :  शशांक मनोहर यांनी आयसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दोन वर्षांच्या दोन टर्म पूर्ण झाल्यामुळे मनोहर यांनी हा निर्णय घेतला. नव्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत उपाध्यक्ष इमरान ख्वाजा यांची हंगामी अध्यक्षपदी निवड झाली आहे. नव्या अध्यक्षांच्या निवडीपूर्वीच मनोहर दूर झाल्यामुळे तो भारतीय क्रिकेट मंडळाचा विजय मानला जात आहे.आयसीसीच्या नव्या अध्यक्षांची निवड काही दिवसांत अपेक्षित आहे. त्यानंतरही मनोहर यांनी पद सोडण्याचे ठरवले आणि आयसीसीनेही तो स्वीकारला आहे आणि सिंगापूर क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष असलेल्या ख्वाजा यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद सोपवण्याचे ठरवले.

कोरोनानंतरच्या टेनिस स्पर्धेत भारताचा सुमीत नागल विजेता

मनोहर यांची आयसीसीचे पहिले स्वतंत्र अध्यक्ष झाल्यानंतर एका वर्षानंतरच ख्वाजा यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती. आयसीसीच्या घटनेत 2017 मध्ये बदल करताना उपाध्यक्षपद तयार करण्यात आले. घटना बदलासाठी असलेल्या पाच सदस्यीय समितीत ख्वाजा यांचा समावेश होता. विश्वकरंडक ट्वेंटी 20 स्पर्धेबाबत अंतिम निर्णय होत नसल्याने भारतीय क्रिकेट मंडळास आयपीएलबाबतची प्रक्रिया सुरू करणे अवघड झाले होते. या स्पर्धेचा निर्णय मनोहर सातत्याने लांबवत होते. त्यांचा आणि भारतीय
क्रिकेट मंडळाचा गेल्या काही महिन्यात सातत्याने खटका उडत होता. विश्वकरंडक ट्वेंटी 20 चा अंतिम निर्णय मनोहरच लांबवत असल्याची टीका भारतीय मंडळ करीत होते.

ICC मध्ये मोठा बदल; शशांक मनोहर यांनी दिला अध्यक्षपदाचा राजीनामा
 
विश्वकरंडक ट्वेंटी 20 स्पर्धेबाबत गोंधळ वाढवून मनोहर काय साधत आहेत? यजमान ऑस्ट्रेलियाची स्पर्धा घेण्याची पुरेशी तयारी नाही, तरीही त्यांनी हा निर्णय जुलैपर्यंत लांबणीवर टाकला आहे. ते भारतीय मंडळास का वेठीस धरत आहेत? विश्वकरंडक ट्वेंटी 20 स्पर्धा लांबणीवर टाकल्यास आयपीएलमध्ये ज्या देशातील खेळाडू नाहीत, त्यांच्या मंडळांनाही स्पर्धा कालावधीतील मालिकांबाबत विचार करता येईल, अशा प्रतिक्रिया 
भारतीय मंडळाचे पदाधिकाऱ्यांमधून उमटल्या होत्या. 


​ ​

संबंधित बातम्या