क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्नीने केलं पतीच्या जागी यष्टीरक्षण

टीम ई-सकाळ
Saturday, 4 July 2020

युरोपीयन क्रिकेट सिरीज टी10 लीगमध्ये एक अनोखी अशी घटना पाहायला मिळाली. क्रिकेटच्या मैदानात  याआधी अशी घटना कधीच घडलेली नाही.

नवी दिल्ली - क्रिकेटच्या मैदानात अनेक अशा घटना घडतात ज्या आश्चर्यचकीत करून सोडणाऱ्या असतात. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्याच्या घडीला खेळावरही संकट कोसळले आहे. दरम्यान कोरोना विषाणूच्या संकटजन्य परिस्थितीतून बाहेर पडत वेगवेगळ्या देशात खेळ सुरु होत आहेत. ज्या युरोपात कोरोनाने सुरुवातीला तांडव केलं त्याठिकाणची परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. येथील खेळाची मैदाने आता पुन्हा बहरु लागली आहेत. फुटबॉलनंतर आता याठिकाणी क्रिकेटचे वारेही वाहताना दिसत आहे. कोरोनातून सावरत रंगलेल्या युरोपीयन क्रिकेट सिरीज टी10 लीगमध्ये एक अनोखी अशी घटना पाहायला मिळाली. क्रिकेटच्या मैदानात  याआधी अशी घटना कधीच घडलेली नाही.

विराटलाही लॉकडाऊनचा फटका बसण्याची शक्यता 

सिरीजच्या सेमीफायनलच्या सामन्यात एक ऐतिहासिक घटना घडली. एका खेळाडूच्या जागी चक्क त्याच्या  पत्नीने विकेटमागची जबाबदारी स्वीकारल्याचे पाहायला मिळाले. क्रिकेटच नाही तर क्रीडा विश्वातील पुरुष स्पर्धेत महिलेने बदली जागा घेण्याची ही कदाचित पहिलीच वेळ ठरली.  केएसव्ही क्रिकेट क्लबकडून खेळणारा फिन सदारंगानी हा यष्टीरक्षक आहे. त्याने सामन्यावेळी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याच्या जागी पत्नी शरान्या सदारंगानी हिने यष्टीरक्षण केलं. या प्रकाराने क्रिडा प्रेमींसह सर्वचजण आश्चर्यचकीत झाले आहेत. 

हे वाचा - धक्कादायक! मेस्सी बार्सिलोनाचा निरोप घेणार? 

शरान्याचा पती फिनला सेमीफायनलमध्ये गोलंदाजी करायची होती. त्यावेळी यष्टीरक्षणाची जबाबदारी शरान्या सदारंगानी हिने स्वीकारली. क्रिकेटच्या मैदानात याआधी असा प्रकार कधीच पाहण्यात आलेला नाही. शरान्या सदारंगानी आणि फिन यांचा प्रेमविवाह आहे. विशेष म्हणजे शरान्याच्या पतीने त्याचं आडनाव बदलून शरान्याचे सदारंगानी हे आडनाव आपल्या नावानंतर लावले आहे. शरान्या सदारंगानी ही नुकतीच चर्चेत आली होती. त्यामागे कारण होतं युरोपियन क्रिकेट सीरीज टी10 लीग. या लीगमध्ये खेळणारी ती पहिली महिला आहे. शरान्या ही भारतीय वंशाची आहे.


​ ​

संबंधित बातम्या