Asia Cup 2018 : 'भारत-पाक सामन्यात Power of Pawar'

वृत्तसंस्था
Thursday, 20 September 2018

शरद पवार दुबईत आहेत भारताला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही, आता भारत नक्की जिंकणार, तसेच, भारत जिंकल्यानंतर शरद पवार यांच्यामुळेच भारत हा सामना जिंकला अशा आशयाचे अनेक मेसेज नेटीझन्सनी सोशल मिडियावर केले आहेत.

दुबई : आशिय कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हॉँगकॉंगवर विजय मिळवताना भारताची खूप दमछाक झाली. भारताने कसाबसा हॉँगकॉंगवर 26 धावांनी विजय मिळवला. मात्र या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्याला आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहिल्याने मात्र सोशल मिडियावर चर्चेला उधाण आले आहे. सोशल मिडीयावर तर शरद पवार यांच्या उपस्थितीमुळेच भारत जिंकला असल्याचा दावा नेटीझन्सनी केला आहे.

संपूर्ण विश्वाचे लक्ष या सामन्याकडे होते. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे व लढतीच्या विशेष दडपणामुळे या सामन्याला क्रिकेटच्या व्यासपीठावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेल्या सामन्याआधी दोनही संघ रांगेत उभे होते. त्यावेळपासूनच, शरद पवार मैदानात आले आणि सोशल मीडियावर चर्चा रंगायल्या सुरु झाल्या की, भारत आता नक्की जिंकणार. यानंतर भारत जिंकल्यानंतरही मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर चर्चा रंगल्या.

शरद पवार दुबईत आहेत भारताला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही, आता भारत नक्की जिंकणार, तसेच, भारत जिंकल्यानंतर शरद पवार यांच्यामुळेच भारत हा सामना जिंकला अशा आशयाचे अनेक मेसेज नेटीझन्सनी सोशल मिडियावर केले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या