इंग्लंडच्या खेळाडूंना वॉट्सन करतोय कोहलीबद्दल सावध

वृत्तसंस्था
Wednesday, 1 August 2018

नवी दिल्ली : विराट कोहली एक उत्तम फलंदाज आहे त्याचबरोबर तो एक उत्तम कर्णधारही आहे. तो क्रिकेटच्या तीनही प्रकाराचा बादशहा आहे. एकदिवसीय क्रिकेट, ट्वेंटी20 आणि आयपीएलमधील त्याचे सर्व विक्रम हे याचे साक्षीदार आहे. स्मिथही एक उत्तम खेळाडू आहे परंतू स्मिथ आणि कोहली या दोघांमध्ये कोहलीचे पारडे जड आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉट्सन याने म्हटले आहे.

दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित असलेला शेन वॉटसन याने स्मिथपेक्षा कोहली सरस असल्याचे मान्य मत व्यक्त केले आहे.

इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी सामन्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, ''भारतीय संघाचे जागतिक क्रमवारीतील प्रथम स्थान पाहता भारतीय संघ जास्त मजबूत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताला पराभूत करणे अवघड आहे.''  

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आज एजबॅस्टन येथे सुरुवात होणार आहे. हा इंग्लंडचा 1000वा सामना आहे.

संबंधित बातम्या