सुशांत सिंहच्या आत्महत्येवर शेन वॉटसनची भावूक प्रतिक्रिया

टीम ई-सकाळ
Tuesday, 16 June 2020

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेन वॉटसनने एक पोस्ट शेअर केली आहे. सुशांत सिंहचा विचार राहून राहून डोक्यात येत आहे. ही घटना दु:खद अशीच आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीसह क्रिडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉटसन हा देखील या घटनेमुळे निशब्द झालाय. 'एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये सुशांतने अप्रतिम भूमिका केली होती. धोनीची प्रतिकृती बनून तो मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. असा उल्लेख करत सुशांत सिंहची आश्चर्यकारकरित्या झालेली एक्स्झिट ही चटका लावून जाणारी असल्याची भावना शेन वॉटसनने व्यक्त केली आहे.  त्याने ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.  

सुशांतच्या आयुष्यातील ते अधुरं स्वप्नं धोनीमुळं झालं पूर्ण! 

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेन वॉटसनने एक पोस्ट शेअर केली आहे. सुशांत सिंहचा विचार राहून राहून डोक्यात येत आहे. ही घटना दु:खद अशीच आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार एम.एस धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात त्याने कमालीचे काम केले होते. हा चित्रपट पाहताना तो धोनी आहे की सुशांत सिंह हे विसरुन जायला होते. त्याच्या जाण्याने अभिनय क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे ट्विट वॉटसनने केले आहे. 

क्रिकेटर बहिणीमुळेच सुशांतला या खेळात विशेष रुची निर्माण झाली होती

शेन वॉटसन आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसते. मागील दोन्ही आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने लक्षवेधी खेळी साकारली होती. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना वॉटसनला धोनीचा खूप मोठा सहवास लाभलाय. धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातील सुशांतची भूमिका त्याला चांगलीच भावली होती. या चित्रपटातील अभिनयाने सुशांत सिंह चांगलाच फार्मात आला होता. 
बॉलिवूडच्या गर्दीत आपल्या कामाचा ठसा उमटवून आपला स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण करणाऱ्या सुशांत सिंहने मुंबईतील वांद्रा येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तणावात येऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले आहे.  


​ ​

संबंधित बातम्या