World Cup 2019 : 'भाजपच्या दबावामुळेच 'या' खेळाडूला केलं संघाबाहेर'(व्हिडिओ)

वृत्तसंस्था
Sunday, 7 July 2019

भारताने लंकेविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहल यांना विश्रांती दिली होती. त्यांच्याऐवजी संघात रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली होती. यामध्ये लंकेविरुद्ध मोहम्मद शमीला जाणीवपूर्वक वगळल्याचं पाकिस्तानी क्रिकेट जाणकाराने म्हटलं आहे.

वर्ल्ड कप 2019 :
नवी दिल्ली : भारतीय संघात भाजपचा हस्तक्षेप चालत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये एका टीव्ही चॅनलवर पाकिस्तानी क्रिकेट तज्ज्ञाने हा खळबळजनक आरोप केला आहे.

भारताने लंकेविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहल यांना विश्रांती दिली होती. त्यांच्याऐवजी संघात रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली होती. यामध्ये लंकेविरुद्ध मोहम्मद शमीला जाणीवपूर्वक वगळल्याचं पाकिस्तानी क्रिकेट जाणकाराने म्हटलं आहे.

शमी चांगली कामगिरी करत होता. त्याने 15 विकेट घेल्यावरही फक्त मुस्लीम आहे म्हणून भाजपच्या दबावाला बळी पडत त्याला प्लेइंग इलेव्हनमधुन बाहेर करण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

पाकचा संघ मायदेशी परतला असून आता तिथले तथाकथित क्रिकेट जाणकार मुक्ताफळं उधळू लागले आहेत. इंग्लंडविरुद्ध भारत मुद्दाम पराभूत झाला म्हणणाऱ्यांनी आता नवीनच आरोप करायला सुरूवात केली असल्याचे यातून दिसून येत आहे.

​ ​

संबंधित बातम्या