World Cup 2019 : शकीब अल हसन..बांगलादेशचा एकखांबी तंबू; केला अनोखा विक्रम!

वृत्तसंस्था
Monday, 24 June 2019

बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसन सध्या तुफान फॉर्मात असून त्याने आज यंदाच्या विश्वकरंडकातील पाचवे अर्धशतक झळकाविले. याचसह त्याने बांगलादेशकडून विश्वकरंडकात एक हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसन सध्या तुफान फॉर्मात असून त्याने आज यंदाच्या विश्वकरंडकातील पाचवे अर्धशतक झळकाविले. याचसह त्याने बांगलादेशकडून विश्वकरंडकात एक हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. 

अफगाणिस्तानविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात शाकिबने 51 धावांची खेळी केली. याच खेळीसह बांगलादेशसाठी विश्वकरंडकात एक हजार धावा कऱणारा तो पहिला खेळाडू ठरला. तसेच अशी कामगिरी करणारा तो क्रिकेटविश्वातील केवळ 19वा खेळाडू ठरला आहे. 

यंदाच्या विश्वकरंडकात त्याच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. त्याने आतापर्यंत 476 धावा केल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ डेव्हिड वॉर्नरने 447 धावा केल्या असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


​ ​

संबंधित बातम्या