पाकमध्ये खेळणाऱ्या डिव्हिलर्सचे आफ्रिदीकडून स्वागत

वृत्तसंस्था
Saturday, 8 September 2018

कराची : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहिर केलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलर्स याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर शाहिद आफ्रिदीने त्याचे स्वागत केले आहे.

डिव्हिलर्सने ट्विटरवरून नुकतेच पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्याचा निर्णय जाहिर केला. डिव्हिलर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याने ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता त्याने पाकिस्तानमध्ये स्थानिक स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

डिव्हिलर्सच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने 2015 च्या विश्वकरंडकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पीएसएलमध्ये तो कोणत्या संघात खेळणार हे निश्चित नाही. पण, तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाकडून खेळतो. 

आफ्रिदीने म्हटले आहे, की माझा मित्र पीएसएलमध्ये खेळत असल्याने त्याचे स्वागत आहे. पाकिस्तानी चाहत्यांना त्याच्या फलंदाजीची शैली आवडते. त्याने स्पर्धेचा आनंद घ्यावा, त्याने पीएसएल निवडल्याने आभार.

​ ​

संबंधित बातम्या