शाहिद आफ्रिदी म्हणतो, गौतम गंभीर हा खेळाडू म्हणून योग्य वाटतो, पण... 

टीम ई-सकाळ
Sunday, 19 July 2020

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांच्या बाबतीत ही गोष्ट थोडी वेगळी आहे.      

भारत आणि पाकिस्तान या दोन संघांची मैदानावरील टक्कर पाहण्यासाठी जगभरात अनेकजण उत्सुक असतात. भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा दरम्यान दोन्ही संघातील खेळाडू देखील एकमेकांविरुद्ध अधिक जोशाने मैदानावर उतरल्याचे नेहमी पहायला मिळते. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर होणारे वाद या सामन्याच्या वेळेस देखील अनेकदा झाल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. सहसा क्रिकेटमधील मैदानावर उदभवलेले वाद  कधी मैदानाबाहेर येत नाहीत. पण भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांच्या बाबतीत ही गोष्ट थोडी वेगळी आहे.      

भारतीय क्रिकेटरच्या 'किस' ची ही स्टोरी तुम्ही 'मिस'तर नाही ना केली  

2007 मधील भारत-पाकिस्तान सामन्याच्या दरम्यान, गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात मैदानावर संघर्ष झाला होता. त्यानंतर अजूनही या दोघांमधील वाद सुरूच असून, दिवसेंदिवस त्याची तीव्रता वाढतच चालल्याचे दिसत आहे. हे दोघे अजूनही एकमेकांचे मोठे शत्रू आहेत. फक्त आता  मैदानाची जागा सोशल मीडियाने घेतली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी सोशल मीडियावर भांडत आहेत. त्यानंतर आता शाहिद आफ्रिदीने माजी पाकिस्तानी टीव्ही होस्ट जैनब अब्बासशी बोलताना, एक सलामीवीर फलंदाज म्हणून गौतम गंभीर हा खेळाडू योग्य वाटतो, पण त्याच्या काही कृतींमुळे माणूस म्हणून त्याला काही समस्या असल्याचे म्हटले आहे. 

तसेच शाहिद आफ्रिदीने यावेळेस गौतम गंभीरवर माजी भारतीय कंडीशनिंग प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी दिलेल्या टिपण्णीचा उल्लेख देखील केला आहे. पॅडी अप्टन यांनी आपल्या पुस्तकात  गौतम गंभीर हा सर्वात दुर्बल आणि मानसिकदृष्ट्या सर्वात असुरक्षित व्यक्ती असल्याचे लिहिले आहे. शिवाय अब्बासशी बोलताना आफ्रिदीने, मला गौतम गंभीर एक क्रिकेटपटू आणि फलंदाज म्हणून आवडतो, पण माणूस म्हणून तो कधीकधी अशा गोष्टी बोलतो की त्यावेळेस तुम्हाला वाटतं की जाऊ द्या त्याला कसलीतरी समस्या आहे, असे आफ्रिदी म्हणाला. 

या कारणामुळे इंग्लंडची सामन्यावर पकड मिळवण्याची मोठी संधी हुकली
          
पॅडी अप्टन यांनी त्यांच्या पुस्तकात केलेल्या टिपण्णीवर, गौतम गंभीरने काहीही चुकीचे नसल्याचे म्हणत, उलट त्यामुळे खेळाबद्दल आणि देशाबद्दल अधिक योगदान करण्यास प्रेरक ठरल्याचे म्हटले होते. याव्यतिरिक्त स्वत: ला आणि भारतीय संघाला जगातील सर्वोत्तम संघ बनवायचे आहे, असे गौतम गंभीरने म्हटले होते. यामुळेच 100 धावा केल्या तरीही मी समाधानी नाही. आणि पॅडी यांनीही आपल्या पुस्तकात याचाच उल्लेख केला आहे आणि मला यात काही चुकीचे वाटत नसल्याचे गंभीरने म्हटले होते. .     
  

 


​ ​

संबंधित बातम्या