शाहिद आफ्रिदीला 'बूम बूम' नाव देणारा आहे भारतीय

वृत्तसंस्था
Wednesday, 29 August 2018

पाकिस्तानचा लल्ला अशी ओळख असलेला शाहिद आफ्रिदीला 'बूम बूम' याला हे नाव एका भारतीय क्रिकेटपटूने दिले आहे, यावर विश्वास बसणार नाही. पण, हे सत्य आहे याचा खुलासा खुद्द आफ्रिदीनेच केला आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानचा लल्ला अशी ओळख असलेला शाहिद आफ्रिदीला 'बूम बूम' याला हे नाव एका भारतीय क्रिकेटपटूने दिले आहे, यावर विश्वास बसणार नाही. पण, हे सत्य आहे याचा खुलासा खुद्द आफ्रिदीनेच केला आहे.

शाहिद आफ्रिदीला षटकार मारण्याचा बादशहा समजले जाते. त्याच्या याच गुणवत्तेमुळे सध्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला बूम बूम असे नाव दिले होते. याबाबतच खुलासा त्याने ट्विटरवरून केला आहे. आफ्रिदीने खेळलेल्या 398 एकदिवसीय सामन्यांत 351 षटकार खेचले आहेत, तर 99 ट्वेंटी-20 सामन्यांत 73 षटकार मारले. सोशल मिडीयावर चाहत्यांशी संवाद साधताना आफ्रिदीने बूम बूम हे नाव का पडले याचा खुलासा केला.

आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, त्याच्या खेळाची अजूनही क्रिकेटविश्वात चर्चा होते. त्याने 20 मार्च 2015 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. आफ्रिदीने शास्त्रींचे नाव सांगितले असले तरी त्याने कोणत्या सामन्यामध्ये आपल्याला हे नाव दिले हे सांगितलेले नाही.


​ ​

संबंधित बातम्या