आफ्रिदीला नेमकं काय झालय? सचिनसंदर्भात पुन्हा एकदा बरळला

टीम ई-सकाळ
Wednesday, 8 July 2020

क्रिकेटच्या मैदानातील महान फलंदाज असलेला सचिन तेंडुलकर  पाकिस्तानचा जलद गोलंदाज शोएब अख्तरला घाबरायचा असे वक्तव्य त्याने पुन्हा एकदा केलंय. यापूर्वीही तो असेच बोलला होता. सचिन ही गोष्ट कधीच मान्य करणार नाही, असेही आफ्रिदीने म्हटले आहे.  

इस्लामाबाद: पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटर शाहिद आफ्रिदीची बेताल वक्तव्ये सुरुच आहेत. त्याची वक्तव्य ही वेडेपणाचा झटका आल्यासारखीच असतात. काही दिवसांपूर्वीच त्याने भारतीय संघ पराभवानंतर माफी मागायचा, अशी निर्थक बडबड केली होती. त्यानंतर आता क्रिकेटच्या मैदानात अशक्यप्राय विक्रम नोंदवून विक्रमादित्य ठरलेल्या सचिनसंदर्भात बोलताना त्याची जीभ घसरली आहे. क्रिकेटच्या मैदानातील महान फलंदाज असलेला सचिन तेंडुलकर  पाकिस्तानचा जलद गोलंदाज शोएब अख्तरला घाबरायचा असे वक्तव्य त्याने पुन्हा एकदा केलंय. यापूर्वीही तो असेच बोलला होता. सचिन ही गोष्ट कधीच मान्य करणार नाही, असेही आफ्रिदीने म्हटले आहे.  

धोनी इन्स्टावर फक्त तिघांनाच करतो फॉलो

आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी पाकिस्तान संघाकडून भारताचा नेहमी पराभव झाला आणि प्रत्येक पराभवानंतर भारतीय खेळाडू माझ्याकडे येऊन माफी मागतात, असे वक्तव्य केले होते. आफ्रिदीचे ते वक्तव्य चुकीचे असल्याचे सिद्ध करणारी बातमी तेव्हा महाराष्ट्र टाइम्सने दिली होती. आता आफ्रिदीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.  जैनब अब्बाससोबतच्या एका ऑनलाइन संभाषणावेळी आफ्रिदीने क्रिकेटमधील अनेक विषयावर भाष्य केले यावेळी त्याने सचिन तेंडुलकरच नव्हे तर जगातील प्रत्येक फलंदाज अख्तरच्या गोलंदाजीला घाबरायचे असे म्हटले आहे.

- क्रिडा जगतातील  बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

युट्यूबवरील कार्यक्रमात सचिनचा उल्लेख करत आफ्रिदी म्हणाला की, सामना सुरू असताना मी स्वेअर लेगला उभे असायचो. अख्तर गोलंदाजी करण्यास आला की सचिनचे हात पाय थरथरत असत. जैनब अब्बाससोबत यूट्यूब चॅनलवरील त्याच्या या वक्तव्यामुळे नऊ वर्षांपूर्वीची आफ्रिदीची बोली पुन्हा एकदा समोर आली आहे. यापूर्वी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून त्याने सचिन अख्तरला घाबरतो, असा उल्लेख केला होता. शोएब अख्तरच्या काही स्पेल अशा असायच्या की सचिन नाही तर जगातील सर्वच फलंदाज घाबरत, असेही त्याने यावेळी म्हटले आहे. यावेळी आफ्रिदीने सचिन सईद अजमलच्या गोलंदाजीलाही घाबरत होता, असे हस्यासपद वक्तव्यही त्याने यावेळी केलय.  
 


​ ​

संबंधित बातम्या