आफ्रिदीचं आपलं काहीही! टीम इंडियाबद्दल केला न पटण्याजोगा दावा

टीम ई-सकाळ
Sunday, 5 July 2020

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत करणे पाकिस्तानला कधीच जमलेलं नाही. दोन्ही संघात विश्वचषकात आतापर्यंत झालेल्या 7 सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे.

इस्लामाबाद : क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 'कांटे की टक्कर' नेहमीच पाहायला मिळते. दोन्ही देशातील चाहत्यामध्येच नव्हे तर भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत ही जगभरातील क्रिडा प्रेमींसाठी पर्वणीच असते. सध्याच्या घडीला क्रिकेटच्या मैदानात भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळतो. टी-20, एकदिवसीय आणि कसोटी या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघ पाकिस्तानच्या कित्येक पटीने पुढे आहे.  विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत करणे पाकिस्तानला कधीच जमलेलं नाही. दोन्ही संघात विश्वचषकात आतापर्यंत झालेल्या 7 सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे.  सुरुवातीच्या काळात पाकिस्तानी संघाने भारताविरुद्ध निर्विवाद यश मिळवल्याचे आकडे सांगतात. याचाच दाखला देत आम्ही भारताला अनेकवेळा पराभूत केले आहे, असे पाकचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटर आफ्रिदीने एका युट्युब चॅनेलवरील मुलाखतीमध्ये म्हटले आहे. 

विराटलाही लॉकडाऊनचा फटका बसण्याची शक्यता 

'क्रिक कास्‍ट' युट्यूब शोमध्ये सवेरा पाशासोबतच्या एका कार्यक्रमात तो सहभागी झाला होता. यावेळी आफ्रिदी म्हणाला की, ''भारतीय संघाच्या विरोधात मैदानात उतरण्यास आम्हाला नेहमीच आवडते. आम्ही त्यांना अनेक वेळा पराभूत केले आहे. आम्ही भारतीय संघाला पराभूत केल्यानंतर संघातील खेळाडू सामन्यानंतर माफी मागायचे, असा दावाही त्याने यावेळी केला. क्रिकेटच्या मैदानातील स्वत:ला भारत आणि ऑस्ट्रेलियन संघाला भिडायला अधिक आवडायचे असेही त्याने यावेळी सांगितले. सुरुवातीच्या काळात पाकचा संघ भारतीय संघाच्या तुलनेत भारी होतो, हे खरं असले तरी सध्याच्या घडीला पाकिस्तानी संघ भारताच्या आसपासही नाही. आफ्रिदी नेहमी भारताच्या विरोधात गरळ ओखताना दिसले आहे. त्यामुळे त्याच्या या वक्तव्य फारसे मनावर घेण्यासारखे नाही, असेच म्हणावे लागेल. 

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्नीने केलं पतीच्या जागी यष्टीरक्षण

1996 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहिद आफ्रिदीने  2018 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याच्या निवृत्तीचा किस्साही हस्यास्पद असाच आहे. 2011 मध्ये भारताने यजमानपद भुषवलेल्या विश्वचषक स्पर्धेत आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. यावेळीही पाकला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताविरुद्ध 1999 मध्ये आफ्रिदीने 141 धावांची स्फोटक खेळी केली होती. ही खेळी अविस्मरणीय असल्याचेही त्याने या कार्यक्रमात सांगितले. यावेळी मला संघात स्थान देण्यात आले नव्हते. वासीम भाई (वासीम आक्रम) आणि तत्कालीन निवड समितीच्या अध्यक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे भारत दौऱ्यावर जाणे शक्य झाले होते, अशी आठवणही त्याने सांगितली. याशिवाय आफ्रिदीने कानपूरच्या मैदानात भारताविरुद्ध  46 चेंडूत 102 धावांची खेळीही केली होती.  
 


​ ​

संबंधित बातम्या