रोनाल्डोच्या पेनल्टीमुळे जुवेंटसचा पराभव टळला! 

टीम ई-सकाळ
Sunday, 12 July 2020

जुवेंटस संघातील ख्रिस्टीयानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोल नंतर देखील जुवेंटस संघाला या सामन्यामध्ये बरोबरीत समाधान मानावे लागले.

सेरी ए फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये अटलांटा आणि जुवेंटस यांच्यातील सामना अनिर्णित राहिला आहे. जुवेंटस संघातील ख्रिस्टीयानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोल नंतर देखील जुवेंटस संघाला या सामन्यामध्ये बरोबरीत समाधान मानावे लागले. अटलांटा आणि जुवेंटस या संघानी खेळाच्या दोन्ही सत्रात मिळून प्रत्येकी 2 - 2 गोल केले.     

पाक क्रिकेट संघाच्या मदतीसाठी धावून आला शाहिद आफ्रिदी ; वाचा काय आहे ते कारण     

अटलांटा आणि जुवेंटस यांच्यातील सामन्यात, अटलांटा संघाच्या दुवान झपाटा ने खेळाच्या पहिल्या सत्रात 16 व्या मिनिटाला पहिला गोल केला. व रुसलान मालिनोव्हस्की ने 80 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. तर जुवेंटस संघातील ख्रिस्टीयानो रोनाल्डोने 55 व्या आणि 90 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल केले. त्यामुळे अटलांटा आणि जुवेंटस यांच्यात झालेल्या या अटीतटीच्या सामन्याचा निकाल अनिर्णित लागला असून, दोन्ही संघाना प्रत्येकी 1 गुण मिळाला आहे.      

सॅम्पदोरियाला नमवत सेरी ए फुटबॉलच्या क्रमवारीत अटलांटा तिसऱ्या स्थानी   

दरम्यान, सेरी ए फुटबॉल चॅम्पियनशिप मध्ये जुवेंटसचा संघ 32 सामन्यांमध्ये 76 गुण मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असून, लाझीओने 32 सामन्यात 68 गुण मिळवत दुसरे स्थान राखले आहे. तर अटलांटा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असून, या संघाने 32 सामन्यांमध्ये 20 सामन्यात विजय मिळवत 67 गुण मिळवले आहेत. आणि  इंटर मिलानचा संघ 65 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर त्यानंतर रोमा 54 अंकांसह पाचव्या नंबरवर आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या