सेरी ए फुटबॉल : जीनोआ विरुद्ध ख्रिस्तियानो रोनाल्डोचा रॉकेट गोल

टीम ई-सकाळ
Wednesday, 1 July 2020

सेरी ए फुटबॉल चॅम्पियनशीपमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोने दुरून केलेल्या रॉकेट गोलमुळे जुवेंटस संघाने आपला उत्तम खेळ कायम ठेवत जीनोआ संघावर 3 -1 ने विजय मिळवला आहे.

सेरी ए फुटबॉल चॅम्पियनशीपमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोने दुरून केलेल्या रॉकेट गोलमुळे जुवेंटस संघाने आपला उत्तम खेळ कायम ठेवत, जीनोआ संघावर 3 - 1 ने विजय मिळवला आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोने मागील दोन सामन्यांच्यावेळेस पेनल्टी संधीचे रूपांतर गोल मध्ये केले होते. मात्र या सामन्यात आपल्या नावाला साजेशी खेळी करत, रोनाल्डोने लांबून गोल केला. या चैंपियनशिप मधील 25  सामन्यांमध्ये आत्तापर्यंत 24 गोल रोनाल्डोने केले आहेत. त्यामुळे जुवेंटसच्या या विजयामुळे गुणतालिकेत संघाचे 3 अंक वाढले असून, सध्या जुवेंटस 72 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. 

कोरोनामुळे आता फुटबॉल मधील 'ही' स्पर्धा रद्द 

लुईगी फेरारीस स्टेडियम येथे झालेल्या जुवेंटस आणि जीनोआ यांच्यातील सामन्यात जुवेंटसच्या संघातील स्ट्राइकर पाओलो डिबालाने 50 व्या मिनिटाला पहिला गोल केला. तर त्यानंतर 56 व्या मिनिटाला क्रिस्टियानो रोनाल्डोने एक गोल नोंदवला. यानंतर डग्लस कोस्टाने 73 व्या मिनिटाला गोल करत संघाची स्थिती मजबूत केली. तर खेळाच्या 76 व्या मिनिटाला जीनोआ संघाच्या अँड्रिया पिनमॉन्टी ने जुवेंटसच्या विरोधात एक गोल नोंदवला.

#वर्णभेदाचा_खेळ :विंडीजचा संघ कॉलर 'टाइट' करुन 'फाइट' देणार 
     
दरम्यान, जुवेंटसचा संघ 29 सामन्यांमध्ये 72 गुण मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असून, लाझीओने 29 सामन्यात 68 गुण मिळवत दुसरे स्थान राखले आहे. तर इंटर मिलानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असून, या संघाने 28 सामन्यांमध्ये 18 सामन्यात विजय मिळवत 61 गुण मिळवले आहेत. आणि  अटलांटा 57 गुणांसह चौथ्या स्थानावर, त्यानंतर रोमा 48 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. 

 


​ ​

संबंधित बातम्या