रोनाल्डोपेक्षा जास्त गोल, अन् तो मेस्सी नव्हे

संजय घारपुरे
Friday, 24 July 2020

रोनाल्डोचा युव्हेंटिस उदीनीसविरुद्ध इटालीयन लीग लढतीत पराजित झाला, अर्थात त्यानंतरही युव्हेंटिसच्या विजेतेपदास फारसा धक्का बसणार नाही.

रोम:  लिओनेल मेस्सीने ला लिगामधील सर्वाधिक गोल करण्यासाठीचा पुरस्कार जिंकला, पण मेस्सीचा पारंपारीक प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डो इटलीतील सिरी ए लीगमधील सर्वाधिक गोलच्या पुरस्काराच्या स्पर्धेत मागे पडला आहे. फुटबॉल जगतात फारशा प्रसिद्ध नसलेल्या सिरो इममोबाईल याने त्याला मागे टाकले आहे. लीगचा अंतिम टप्पा सुरु झाल्याने रोनाल्डोवरील दडपण वाडले आहे. 

कुस्तीगीरांचा लवकरच सराव पण कोणाबरोबर?

रोनाल्डोचा युव्हेंटिस उदीनीसविरुद्ध इटालीयन लीग लढतीत पराजित झाला, अर्थात त्यानंतरही युव्हेंटिसच्या विजेतेपदास फारसा धक्का बसणार नाही. या पराभवानंतरही युव्हेंटिसने दुसऱ्या क्रमांकावरील अ‍ॅटलांटास सहा गुणांनी मागे टाकले आहे. तीनपैकी एका सामन्यात त्यांनी विजय मिळवला तरी त्यांचे जेतेपद निश्चित होऊ शकेल. मात्र रोनाल्डोला या सामन्यात एकही गोल करता आला नाही आणि हे त्याच्या चाहत्यांना जास्त सलत आहे.

थम्स अप पितोय म्हणून पदासाठी अपात्र कसे? गांगुली यांचा खास किस्सा

रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी अचानक कॅगलियारीचे गोल महत्त्वाचे झाले आहेत. कॅगलियारी लॅझिओविरुद्ध 1-2 पराजित झाले, पण कॅगलियारीचा एकमेव गोल सिरो इममोबाईल याने केला. इममोबाईलचा सिरी ए मोसमातील 31 वा गोल आहे, तर रोनाल्डोचे 30 गोल आहेत. 
इममोबाईलची कामगिरी सच्चा इटालीयन फुटबॉल प्रेमींनाही सुखावत आहे. या लीगमध्ये तीस गोल केलेला तो इटलीचा केवळ पाचवा फुटबॉलपटू ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी ल्युका टोनी याने केली होती.  


​ ​

संबंधित बातम्या