सेरेनाचीही रॉजर कपमधून माघार

वृत्तसंस्था
Monday, 6 August 2018

अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना व्हिल्यम्सने पुढील आठवड्यात होणाऱ्या रॉजर कप स्पर्धेतून वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली आहे.

टोरंटो : अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना व्हिल्यम्सने पुढील आठवड्यात होणाऱ्या रॉजर कप स्पर्धेतून वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली आहे.

तीन वेळा रॉजर कप विजेती असलेल्या सेरेनाला या वर्षीच्या रॉजर कपमध्ये आयोजकांतर्फे 'वाईल्डकार्ड एन्ट्री' देण्यात आली होती. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे तिने स्पर्धेतून माघार घेतली आहे. सेरेनाला यंदाच्या विंबल्डन स्पर्धेत अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला. तसेच ती 2015नंतर रॉजर कपमध्ये सहभागी झालेली नाही.

''सेरेना स्पर्धेत सहभागी होणार नाही याचे आम्हाला फार दुख: आहे. तिला पुन्हा खेळताना पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक होते.'' अशी खंत स्पर्धेच्या आयोजकांनी व्यक्त केली. यापूर्वी रॉजर फेडरर आणि अॅंडी मरे या दोघांनीही रॉजर कप स्पर्धेतून माघार घेतली आहे. 

सेरेनाच्या ऐवजी जर्मनीच्या तातजॅना मारीया हिला 'वाईल्डकार्ड एन्ट्री' दिली जाणार आहे. 'वाईल्ड कार्ड' हे विशिष्ट तरतूदी पूर्ण करणाऱ्या तसेच जागतिक क्रमवारीत एकदातरी प्रथम क्रमांक मिळवलेल्या खेळाडूंसाठी राखीव ठेवण्यात आलेले असते.

संबंधित बातम्या