मी रडकी नाही, मात्र मी आता लढू शकत नाही

वृत्तसंस्था
Monday, 12 August 2019

'मी रडकी नाही, मी कदापी हार मानत नाही. यावेळी मात्र मी लढू शकले नाही. मला माफ करा.' महिला टेनिसमधील पॉवरगेमची व्याख्या आणि कामगिरीचा मापदंड उंचावलेली अमेरिकेची महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने हे उद्गार काढले. रॉजर्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिला कॅनडाच्या बियांना आंद्रीस्कू हिच्याविरुद्ध पाठदुखीमुळे माघार घ्यावी लागली.

टोरांटो - 'मी रडकी नाही, मी कदापी हार मानत नाही. यावेळी मात्र मी लढू शकले नाही. मला माफ करा.' महिला टेनिसमधील पॉवरगेमची व्याख्या आणि कामगिरीचा मापदंड उंचावलेली अमेरिकेची महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने हे उद्गार काढले. रॉजर्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिला कॅनडाच्या बियांना आंद्रीस्कू हिच्याविरुद्ध पाठदुखीमुळे माघार घ्यावी लागली. 

सेरेना केवळ 16 मिनिटे खेळू शकली. 1-3 अशा पिछाडीनंतर तिने माघार घेतली. कोर्टवर बियांकाने तिच्याशी संवाद साधला आणि समजूत काढली, पण बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी करंडक स्वीकारल्यावर सेरेना भावविवश झाली. 

19 वर्षांची बियांका म्हणाली की, "अशा पद्धतीने जिंकण्याची अपेक्षा मला नव्हती. तू खरोखरच चॅंपियन आहेस.' सेरेनाला 38वे वय सुरू आहे. तिने आधी वैद्यकीय उपचार करून घेतले, पण खेळता येणे शक्‍य नसल्याचे तिला कळून चुकले. "आता शरीराचे ऐकण्याची वेळ आली आहे,' अशी भावनाही तिने व्यक्त केली.

संबंधित बातम्या