US Open : सेरेना भडकली अन् पंचांना म्हणाली चोर

वृत्तसंस्था
Sunday, 9 September 2018

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन स्पर्धेतील महिला एकेरीतील अंतिम फेरीत ओसाकाच्या पहिल्या ग्रॅण्ड स्लॅम विजयासह सेरेनाने पंचाना 'चोर' म्हटल्याची घटनाही चांगलीच रंगली. एकाच सामन्यात तिला नियमाचा भंग केल्याने दंड, एका गुणाचा दंड आणि सामन्यातील मानधनाचाही दंड ठोठावण्यात आला. 

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन स्पर्धेतील महिला एकेरीतील अंतिम फेरीत ओसाकाच्या पहिल्या ग्रॅण्ड स्लॅम विजयासह सेरेनाने पंचाना 'चोर' म्हटल्याची घटनाही चांगलीच रंगली. एकाच सामन्यात तिला नियमाचा भंग केल्याने दंड, एका गुणाचा दंड आणि सामन्यातील मानधनाचाही दंड ठोठावण्यात आला. 

सेरेनाचे प्रशिक्षक बाहेरुन तिला मार्गदर्शन करत आहे हे लक्षात आल्यावर सामन्याचे पंच कार्लोस रामॉस यांनी तिने नियमाचा भंग केल्याने तिला दंड ठोठावला. पुढे दुसऱ्या सेटमध्ये तिने आपले रॅकेट जोरदार आपटले आणि त्यामुळे तिचा एक गुण काढून घेण्यात आला. या प्रकारवर संताप व्यक्त करत ती आक्रमकपणे पंचाकडे गेली आणि त्यांना हातवारे करुन त्यांच्याशी भांडू लागली.  

या सर्व प्रकारावर व्यक्त होताना ती सामन्याचे पंच यांच्यावर 'चोर' असल्याचा आरोप केला. ''तुम्ही खोटारडे आहात. तुम्ही जिवंत असेपर्यंत पुन्हा कधीही माझ्या सामन्यात पंच म्हणून यायचे नाही. तुम्ही माझा माफी कधी मागणार आहे ते सांगा, माझी माफी मागा,'' अशा शब्दात तिने पंचाना बडबडही केली. 

''मी तिला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत होतो मात्र तिचे माझ्याकडे लक्ष नव्हते. ओसाकाचे प्रशिक्षकही तिला मार्गदर्शन करत होते. सगळेच प्रशिक्षक हे करतात,'' असे स्पष्टीकरण सेरेनाचे प्रशिक्षक पॅट्रीक मोराटोग्लू ESPN शी बोलताना दिले. 

यासर्व प्रकारावर बोलताना सेरेना म्हणाली, ''पंचानी मी लबाडी करत असल्याचा आरोप केला, पण मी असे काहीच केले नव्हतो तरीही त्यांनी माझा एक गुण काढून घेतला म्हणून मी त्यांनी 'चोर' म्हटले.'' ''कोणत्याही पुरुषाने पंचाना 'चोर' म्हटल्याने त्यांनी कधीच त्या खेळाडूला 'गेम पेनल्टी' दिली नव्हती,'' असे म्हणत तिने रामॉस यांच्यावर 'सेक्सिस्ट' असल्याचा आरोप केला. 

ऑस्ट्रेलियाच्या महान टेनिसपटू मार्गरेट कोर्ट यांच्या 24 ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपदांशी बरोबरी करण्याची संधी सेरेनाने स्वत:च्या अखिलाडूवृत्तीमुळे गमावली. 

 


​ ​

संबंधित बातम्या