मुलासोबत चहा घेतला म्हणून थेट कारवाई? हा इगो आहे की वैचारिक मागासलेपणा?

टीम ई सकाळ
Monday, 27 May 2019

एका मुलीने तिच्या मित्राबरोबर चहा घेणं ही गोष्ट पुण्यात माना वळून पाहण्यासारखी अजिबात राहिलेली नाही. तरीही बालेवाडीमध्ये क्रीडा प्रशिक्षण घेणार्‍या एका उमद्या आणि आश्वासक तरुण खेळाडूला निलंबित करण्यात आले आहे. सगळ्याच बाबतींमध्ये पुढारलेलं शहर म्हणून पुणेकर जवळपास रोजच प्रत्येक ठिकाणी अभिमान व्यक्त करत असतात. इथं फर्ग्युसन-स. प. महाविद्यालयासारख्या विश्वविख्यात संस्था आहेत.. तरुणाईनं सदा फुललेले रस्ते आहेत.. कॉम्प्युटरपासून खेळाच्या मैदानापर्यंत कुठेही जग जिंकण्याची ताकद, हिंमत आणि कुवत असणारी नवी पिढीही इथेच आहे..

एका मुलीने तिच्या मित्राबरोबर चहा घेणं ही गोष्ट पुण्यात माना वळून पाहण्यासारखी अजिबात राहिलेली नाही. तरीही बालेवाडीमध्ये क्रीडा प्रशिक्षण घेणार्‍या एका उमद्या आणि आश्वासक तरुण खेळाडूला निलंबित करण्यात आले आहे. सगळ्याच बाबतींमध्ये पुढारलेलं शहर म्हणून पुणेकर जवळपास रोजच प्रत्येक ठिकाणी अभिमान व्यक्त करत असतात. इथं फर्ग्युसन-स. प. महाविद्यालयासारख्या विश्वविख्यात संस्था आहेत.. तरुणाईनं सदा फुललेले रस्ते आहेत.. कॉम्प्युटरपासून खेळाच्या मैदानापर्यंत कुठेही जग जिंकण्याची ताकद, हिंमत आणि कुवत असणारी नवी पिढीही इथेच आहे.. नव्या जगाशी नाळ जुळवून घेत पुराणमतवादी विचारसरणी फेकून देण्यातही हेच पुणेकर आघाडीवर आहेत.. 

तरीही याच पुणेकरांमधील काही जण अजूनही खुळचट कल्पनांना चिकटून बसले आहेत. क्रीडा मार्गदर्शकांच्या गंज लागलेल्या विचारसरणीचा फटका राष्ट्रीय स्तरावरील या खेळाडूला आता भोगावा लागत आहे. जाहीर करण्याचं कारण म्हणजे 'तिनं तिच्या मित्राबरोबरा चहा घेतला'! न जाहीर केलेलं कारण म्हणजे बुरसटलेली मानसिकता..! 

काय करायचं या लोकांचं..? किती आणि कशा पद्धतीनं ओरडलं, की बड्या पदावर बसलेली ही मानसिकता जरा माणसाळेल? 

तुम्हाला काही उपाय सुचतोय? लिहून पाठवा आम्हाला webeditor@esakal.com या ई-मेल आयडीवर!

'मित्राबरोबर चहा घेणे' या कारणावरुन एका खेळाडूचे निलंबन करण्याचा निर्णय बालेवाडीतील क्रीडा मार्गदर्शकांनी घेतला आहे. हा निर्णय समर्थनीय आहे, असे वाटते का?

काय आहे नक्की हे प्रकरण? वाचा सविस्तर :

मित्राशी बोलली म्हणून 'तिची' क्रीडा प्रबोधिनीतून हकालपट्टी

संबंधित बातम्या