सेहवागने का दिला तडकाफडकी राजीनामा

वृत्तसंस्था
Monday, 17 September 2018

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचा (डीडीसीए) तडकाफडकी राजीनामा दिला आहे. डीडीसीएतील हितांना प्राधान्य देत त्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

सेहवागसह आकाश चोप्रा, राहुल संघवी यांनीही राजीनामा देत गोलंदाजी प्रशिक्षक मनोज प्रभाकर यांना कायम ठेवण्याची शिफारस केली आहे. मात्र, त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. डीडीसीएतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघांचाही राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राज्य संघटनेला दोन दिवसांत न्यायालयाच्या निर्देशानुसार नवी नियमावरील द्यायची आहे. त्यानंतर नव्या समितीची घोषणा होणार आहे.  

दिल्ली क्रिकेटची सुधारणा होण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि हा निर्णय घेतला. नवी समिती स्थापन झाल्यानंतर निर्णय घेता येतील. आम्ही तिघेही आमच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून दिल्ली क्रिकेट समितीसाठी योगदान देणार आहोत, असे सेहवागने सांगितले.

​ ​

संबंधित बातम्या