लॉकडाऊनमध्ये वीरेंद्र सेहवाग बनवतोय प्रवासी कामगारांसाठी जेवन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

यासंबंधीचे खास फोटो इंस्टाग्राम वर सेहवागने पोस्ट केले आहेत.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे, स्वतःच्या घरापासून दूर दुसऱ्या राज्यामध्ये अडकलेले हजारो प्रवासी कामगार अडचणीत सापडले असताना अनेक दिग्गज कामगारांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा देखील कामगारांसाठी स्वतःच्या घरामध्ये जेवन बनवत आहे. जेवनाची पाकिटे भरतानाचे खास फोटो इंस्टाग्राम वर सेहवागने पोस्ट केले आहेत. त्यासोबतच त्याने चहत्यांना खास आवाहन देखील केले आहे. 

सेहवागने इंस्टाग्राम वर केलेल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, आपल्या घारमध्ये आरामात अन्न बनवून ते अन्न गरजू लोकांना वितरीत करण्यात मिळणारे सामाधान मोठे आहे. पोस्ट केलेल्या फोटो मध्ये दिसत आहे की सेहवाग कामगारांसाठी अन्न पाकिटांमध्ये भरताना दिसत आहे. त्याच्या या चांगल्या कामामुळे असंख्य खेळाडूना नक्कीच प्रेरणा मिळेल. सेहवागने त्याच्या चगत्यांना अवाहन केले आहे की, जर कोणी शंभर लोकांना मदत करण्याची इच्छा अशेल तपर तुम्ही सेहवाग फाउंडेशनशी संपर्क करा. सेहवागच्या या कामाची सोशल मिडीयावर स्तुती होत आहे. 

 

 

सेहवागच्या अगोदर अनेक भारतीय क्रिकेटपटू मदतीसाठी पुढे आले आहेत, फिरकीपटू हरभजन सिंहने पंजाबमधील गरजू नागरीकांसाठी अन्नदान केले आहे. तसेच फलंदाज युवराज सिंह देखील यू वी कॅन च्या माध्यमातून नागरीकांची मदत करत आहे. युवराजने दवाखाण्यात पीपीई किट दान केले आहेत. 
 


​ ​

संबंधित बातम्या