इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात उद्या रंगणार दुसरा कसोटी सामना  

टीम ई-सकाळ
Wednesday, 15 July 2020

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना उद्या गुरुवारी 16 जुलै पासून मँचेस्टर येथे खेळला जाणार आहे.

कोरोनाच्या महामारीतून सावरत इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर, साउथहॅम्प्टनच्या मैदानात यजमान इंग्लंड संघाला नमवत पाहुण्या विंडीज संघाने विजय मिळवला होता. त्यानंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना उद्या गुरुवारी 16 जुलै पासून मँचेस्टर येथे खेळला जाणार आहे. त्यामुळे सर्वच क्रिकेट चाहत्यांची नजर या दुसऱ्या कसोटी सामन्याकडे असणार आहे.  

विराट कोहली असलेल्या वर्ल्ड टी -20 संघाचे नेतृत्व हिटमॅन रोहितकडे          

कोरोनाच्या काळानंतर इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा रुळावर येऊ लागले आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात 8 जुलै रोजी पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजांसोबत गोलंदाजांनी देखील उत्तम कामगिरी केली. सामन्यातील पाचव्या दिवशीच्या खेळादरम्यान इंग्लंड संघाला  313 धावांवर रोखत, वेस्ट इंडिज संघाने 200 धावांचे लक्ष्य ब्लॅकवुडने केलेल्या 95 धावांच्या जोरावर पार केले. आणि त्यामुळे वेस्ट इंडिज संघाने 4 गडी राखत इंग्लंड वर विजय मिळवला. या विजयामुळे वेस्ट इंडिज संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकत 1 - 0 ने आघाडी मिळवली आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात 4 विकेट आणि दुसर्‍या डावात 5 बळी घेणारा शॅनन गॅब्रिएल सामनावीर ठरला होता.      

ला लिगा : रिअल माद्रिद-बार्सिलोनामध्ये रस्सीखेच कायम                   

त्यामुळे उद्या होणारा दुसरा कसोटी सामना देखील वेस्ट इंडीज संघाने जिंकल्यास विंडीजचा संघ इंग्लंडमध्ये 32 वर्षानंतर कसोटी मालिका जिंकेल. यापूर्वी 1988 मध्ये विंडीज संघाने इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 4 - 0 ने हरवले होते. यापूर्वीच्या आकडेवारीनुसार, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ 157 कसोटी सामने खेळले आहेत. त्यांपैकी 49 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. तर 57 सामन्यांत इंग्लंड पराभव पत्करावा लागला आहे. त्याचवेळी इंग्लंड संघाने घरातील विंडीजविरुद्धच्या झालेल्या 87 सामन्यांपैकी 34 सामने जिंकले आहेत. तर 31 सामने इंग्लंड संघाने गमावले आहेत. आणि 22 सामने अनिर्णित राहिले आहेत. 

 


​ ​

संबंधित बातम्या