Schoolympics : तितिक्षा पवारला सुवर्ण, रौप्यपदक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 December 2018

पुणे : मिलेनियम प्रशालेच्या तितिक्षा पवार हिने यंदा स्कूलिंपिक टेबल टेनिस स्पर्धेत 12 ते 14 वर्षे वयोगटात सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली. एकेरीत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पण, एकेरीत हुकलेले सुवर्णपदक तिने दुहेरीत सायली पाटीलच्या साथीत मिळविले. 

एकेरीच्या अंतिम फेरीत तिला सेवासदनच्या मयूरी ठोंबरेकडून 3-11, 3-11, 7-11 असे पराभूत व्हावे लागले. दुहेरीत तिने सायली पाटीलच्या साथीत अक्षरा इंटरनॅशनल प्रशालेच्या अस्मी जैन, वैदेही राजेश जोडीचा 11-3, 11-3, 11-4 असा पराभव करून सुवर्णपदक मिळविले. 

12 ते 14 वर्षे 
मुले एकेरी : मयूरी ठोंबरे (सेवासदन इंग्लिश माध्यम स्कूल, पटवर्धन बाग), तितिक्षा पवार (मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर), तन्वी शिरोळीकर (ज्ञानदीप इंग्लिश माध्यम प्रशाला, वडगांव) मुले : आदित्य जोरी (मॉडर्न प्रशाला), सनत जैन (सिंबायोसिस प्रशाला), सम्यक मोटलिंग (भारतीय विद्याभवन सुलोचना नातू विद्यामंदिर, सेनापती बापट रोड) 

मुली दुहेरी : सायली पाटील, तितिक्षा पवार (मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर), अस्मी जैन, वैदेही राजेश (अक्षरा इंटरनॅशनल स्कूल, वाकड), ऐश्‍वर्या दीक्षित, रिया बलशेटवार(मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर) 

​ ​

संबंधित बातम्या