Schoolympics :शाहू विद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 December 2018

कोल्हापूर - सकाळ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद छत्रपती शाहू विद्यालयाने (एसएससी) पटकावले. शिंगणापूरच्या राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेने उपविजेते, तर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने (सीबीएसई) तृतीय क्रमांक मिळविला.

कोल्हापूर - सकाळ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद छत्रपती शाहू विद्यालयाने (एसएससी) पटकावले. शिंगणापूरच्या राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेने उपविजेते, तर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने (सीबीएसई) तृतीय क्रमांक मिळविला.

सेंट झेवियर्स हायस्कूलची विद्यार्थिनी पूर्णा पाटील चॅम्पियन गर्ल, तर डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतनचा विद्यार्थी बालाजी पाटील चॅम्पियन बॉय ठरला. विजेत्यांची नावे जाहीर होताच खेळाडूंच्या जल्लोषाने वातावरण भारावून गेले आणि टाळ्यांच्या कडकडाटात सभागृह दणाणून गेले. हॉटेल सयाजीमधील व्हिक्‍टोरिया हॉलमध्ये आयोजित शानदार सोहळ्यात बक्षीस वितरण झाले. 

सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार व मॅप्रो फूडस्‌ प्रायव्हेट लिमिटेडचे ओनर निकुंज वोरा यांच्या हस्ते छत्रपती शाहू विद्यालयाला दोन लाख रुपये व चषक देण्यात आला. उपविजेता राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेला एक लाख व चषक, तर तृतीय क्रमांक विजेता संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला (सीबीएसई) पन्नास हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. 

उत्कंठा, आतुरता व भारावलेल्या वातावरणातच खेळाडू आले होते. स्पर्धेतील जेतेपदाची झळाळी त्यांच्या चेहऱ्यावर होती. उत्सुकता होती ती फक्त सर्वसाधारण विजेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची. तो क्षण जवळ येईल, तसतशी खेळाडूंच्या हृदयातील धडधड वाढत होती. विजेतेपदाचे नाव जाहीर होताच छत्रपती शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

शिंगणापूरच्या राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेने उपविजेतेपद पटकावल्यानंतर त्यांच्या खेळाडूंच्या आनंदाला पारावर उरला नाही. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला तृतीय क्रमांक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंदोत्सवच साजरा केला. याप्रसंगी ‘सकाळ’चे बिझनेस हेड (इव्हेंटस) राकेश मल्होत्रा, निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, डी. वाय. पाटील ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ साळोखे, संजय घोडावत ग्रुपचे विश्‍वस्त विनायक भोसले, हॉटेल खवय्याच्या ओनर प्रिया ओसवाल व संजीवनी ओसवाल उपस्थित होते.


​ ​

संबंधित बातम्या