Schoolympics : सत्यजित, अक्षय, रत्नेश, विराज विजेते

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 December 2018

कोल्हापूर - ‘सकाळ’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स नेमबाजी स्पर्धेत मुलांच्या गटात सत्यजित पाटील, अक्षय कामत, रत्नेश कुंभार, विराज पाटील व समर्थ मंडलिक यांनी आपापल्या वयोगटात सुवर्णपदक पटकावले. दुधाळी शूटिंग रेंजवर स्पर्धा झाली. 

निकाल अनुक्रमे असा : १२ ते १४ वर्षांखालील मुले- ओपन साईट रायफल दहा मीटर- सत्यजित पाटील (विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल), समर्थ पाटील (एस. एम. लोहिया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय), शंतनू पाटील (डी. सी. नरके विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय). एयर पिस्टल १० मीटर- अक्षय कामत (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी), साईराज पाटील (महावीर इंग्लिश स्कूल), अरमान आरवाडे (डी. सी. नरके विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय). 

१४ ते १६ वर्षांखालील- ओपन साईट रायफल १० मीटर- रत्नेश कुंभार (एस. एम. लोहिया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय), सुजल पाटील (अल्फान्सो स्कूल), प्रतीक लाड (एस. एम. लोहिया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय). 

पीप साईट रायफल १० मीटर- विराज पाटील (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई), सुमेध सासने (सांगरूळ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय), ऋतुराज यादव (हणमंतराव चाटे स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय), एयर पिस्टल १० मीटर- समर्थ मंडलिक (महाराष्ट्र हायस्कूल), शौरियन डुणूंग (प्रायव्हेट हायस्कूल), दीप फराकटे (विबग्योर हायस्कूल).

​ ​

संबंधित बातम्या