Schoolympics : राजर्षी शाहू विद्यानिकेतन मुलींच्या गटात भारी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 December 2018

कोल्हापूर - शिंगणापूरच्या राजर्षी शाहू विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेने सडोलीच्या नागेश्‍वर हायस्कूलवर एकतर्फी विजयाची नोंद करीत ‘सकाळ’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स कबड्डी स्पर्धेतील मुलींच्या गटातील विजेतेपद पटकावले. एलआयसी कॉलनीतील मैदानावर ही स्पर्धा झाली.

शाहू विद्यानिकेतनच्या खेळाडूंनी चढायांवर जोर देत नागेश्‍वर हायस्कूलच्या खेळाडूंना बाद करण्यावर भर दिला. नागेश्‍वर हायस्कूलच्या खेळाडू चढायांमध्ये कमी पडल्या. त्यांच्या संरक्षणाची बाजूही कमकुवत होती. शाहू विद्यानिकेतनच्या खेळाडूंनी गुण वसूल करण्यात कोणतीच कमतरता ठेवली नाही. हा सामना २६ विरुद्ध ६ गुणफरकाने जिंकून विजेतेपदावर कब्जा केला.

तृतीय क्रमांकाच्या लढतीत शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलने गोकुळ शिरगावच्या अंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा ४७ विरुद्ध १४ गुण फरकाने पराभव केला.

राजर्षी शाहू विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेचा संघ असा : अनुराधा अवदान, नेहा कुंभार, उषा नाईक, अनुराधा निकम, आस्था पाटील, प्रतीक्षा पाटील, साक्षी पाटील, सलोनी पाटील, सानिका पाटील, अंजली फडतारे, श्रुतिका रेडेकर, उज्ज्वला सुतार.

नागेश्‍वर हायस्कूलचा संघ असा : गौरी बिल्ले, अमृता दिवसे, श्‍वेता गोंगाणे, सीमा गोरडे, तृप्ती जंगम, साक्षी जोंग, समृद्धी जोंग, श्रुती जोंग, श्रावणी कुडित्रेकर, संध्या कुंभार, वेदिका पाटील, आरती वाळकुंजे.

​ ​

संबंधित बातम्या