Schoolympics : चिन्मय, हर्षवर्धन, अथर्वला विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 December 2018

कोल्हापूर - बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात चिन्मय ढवळशंख, हर्षवर्धन इटकरकर व अथर्व ठाकूर यांनी आपापल्या वयोगटात विजेतेपद पटकाविले. दुहेरीत चिन्मय ढवळशंख व साई नागेशकर, आर्यन देसाई व मल्हार शेंद्रे, ऋतुराज घोरपडे व सोहम पटेल यांनी आपापल्या वयोगटात बाजी मारली. सकाळ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स बॅडमिंटन स्पर्धा सासने मैदानावरील दिलीप देसाई हॉलमध्ये झाली. 

कोल्हापूर - बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात चिन्मय ढवळशंख, हर्षवर्धन इटकरकर व अथर्व ठाकूर यांनी आपापल्या वयोगटात विजेतेपद पटकाविले. दुहेरीत चिन्मय ढवळशंख व साई नागेशकर, आर्यन देसाई व मल्हार शेंद्रे, ऋतुराज घोरपडे व सोहम पटेल यांनी आपापल्या वयोगटात बाजी मारली. सकाळ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स बॅडमिंटन स्पर्धा सासने मैदानावरील दिलीप देसाई हॉलमध्ये झाली. 

एकेरी - १० ते १२ वर्षांखालील : चिन्मय ढवळशंख (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) वि. वि. सिद्धेश सावंत (न्यू होरायझन स्कूल, सीबीएसई) (२१-१७, २१-१०), अदित्य आहुजा (विबग्योर हायस्कूल) वि. वि. साई नागेशकर (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) (२१-१३, २१-१४). 
१२ ते १४ वर्षांखालील - हर्षवर्धन इटकरकर (विबग्योर हायस्कूल) वि. वि. पार्थ गुणे (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) (२१-१०, २११२), मल्हार शेंद्रे (न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल) वि. वि. स्वरूप पाटील (सर्वोदय विवेक जीवन विद्या पब्लिक स्कूल) (२१-१९, २१-१६). 
१४ ते १६ वर्षांखालील - अथर्व ठाकूर ( श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) वि. वि. तन्मय कोरगावकर (विबग्योर हायस्कूल) (२१-१५, २१-१६), रितेश सांदुगडे (कोल्हापूर पब्लिक स्कूल) वि. वि. वेदांत होगाडे (डी. के. टी. ई. इंग्लिश मीडियम हायस्कूल) (२१-१६, २१-१८). 
दुहेरी - १० ते १२ वर्षांखालील - चिन्मय ढवळशंख व साई नागेशकर (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) वि. वि. श्रेयश जाधव व सिद्धेश सावंत (न्यू होरायझन स्कूल) (२१-१३, २१-७), अनिष डेंबन व सुप्रीत हलगली (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. भौमिक बाबी व हर्ष जैन (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) (२१-१७, २१-१४). 
१२ ते १४ वर्षांखालील - आर्यन देसाई व मल्हार शेंद्रे (न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल) वि. वि. विश्‍वराज चव्हाण व निधीश कमल (न्यू होरायझन स्कूल, सीबीएसई) (२१-१०, २१-१८), सोहम देशपांडे व राघव सोमनी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. मोहित भोसले व अदित्य उंबराणी (शांतिनिकेतन) (२१-१२, २१-१३). 
१४ ते १६ वर्षांखालील - ऋतुराज घोरपडे व सोहम पटेल (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. रितेश सांदुगडे व सुयश शिंदे (कोल्हापूर पब्लिक स्कूल) (१५-२१, २१-११, २१-१५), अथर्व ठाकूर (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) वि. वि. यश कापडी (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) (विजयी घोषित).


​ ​

संबंधित बातम्या