Schoolympics : छत्रपती शाहू विद्यालयाला विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 December 2018

कोल्हापूर - पोलो मैदानावर झालेल्या फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात छत्रपती शाहू विद्यालयाने (एसएससी) देवाळे विद्यालयावर ४ विरुद्ध १ गोलफरकाने मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. मुलांच्या गटात महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने कुडित्रेच्या डी.सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेजला २-० ने पराभव करत विजेतेपद पटकावले.

कोल्हापूर - पोलो मैदानावर झालेल्या फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात छत्रपती शाहू विद्यालयाने (एसएससी) देवाळे विद्यालयावर ४ विरुद्ध १ गोलफरकाने मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. मुलांच्या गटात महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने कुडित्रेच्या डी.सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेजला २-० ने पराभव करत विजेतेपद पटकावले.

सकाळ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स अंतर्गत फुटबॉल स्पर्धा झाली.
मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात शाहू विद्यालयाने देवाळे विद्यालयाची बचावफळी कमकुवत असल्याचे सिद्ध करत जोरदार चढाया केल्या. त्यांच्या अंजू देवीने १०, २९ व ३४ व्या मिनिटाला गोल केला. सौम्या कागलेने २२ व्या मिनिटाला गोलची नोंद केली.

देवाळे विद्यालयाकडून कल्याणी पाटील हिला एक गोल करता आला. शाहू विद्यालयाच्या संघात इशा भालकर, सानिका भोसले, भक्ती बिरंगड्डी, रिया बोलके, चानू, श्वेताली दळवी, अंजू देवी धनश्री गवळी, सौम्या कागले, श्रावस्ती कोळतकर, दिव्या माने, मुस्कान मोमीन, आर्या नलवडे, निहारिका पाटील, रम्याश्री प्रसाद, देविका सरनोबत, निदा सातरमेकर, वैदेही शिंदे यांचा समावेश होता.

तृतीय क्रमांकाच्या लढतीत देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूलने गडहिंग्लजच्या न्यू होरायझन स्कूलवर (सीबीएसई) २-०ने मात केली. त्यांच्या कल्याणी वाडकर व निकिता मोरे यांनी प्रत्येकी एक गोल केला.

मुलांच्या गटात महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेजने डी. सी नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेजचा २-०ने पराभव केला. त्यांच्या विश्व शिंदे व रोहित देसाई यांनी प्रत्येकी एक गोल केला. महाराष्ट्राच्या संघात मोहम्मद खुर्शिद, मोहसीन बागवान, संकेत बुचडे, पुष्पक चव्हाण-बंदरे, गंधर्व चव्हाण, ओम चोपदार-शिंदे, रोहित देसाई, संकेत जाधव, आदित्य लायकर, संकेत या, सोमेश मेटिल, सिद्दिक नायकवडी, आराध्य पाथरे, अनिरुद्ध पाटील, ओम पोवार, प्रशांत सलवादे, ओम शेळके, विश्व शिंदे यांचा समावेश होता.

तृतीय क्रमांकाच्या लढतीत सेंट झेवियर्स हायस्कूलने एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेजवर टायब्रेकरवर ३ विरुद्ध १ गोलफरकाने मात केली.


​ ​

संबंधित बातम्या