Schoolympics :कुंभार, न्यू होरायझन, देवाळे, शाहू विद्यालय उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 December 2018

कोल्हापूर - सकाळ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल, न्यू होरायझन स्कूल, देवाळे विद्यालय, छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी), तर मुलांच्या गटात महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेंट झेवियर्स हायस्कूल, डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज व  एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पोलो मैदानावर स्पर्धा सुरू आहे.

निकाल असा : मुली - देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल वि. वि. प्रायव्हेट हायस्कूल (टायब्रेकर ४ विरुद्ध ३), न्यू होरायझन स्कूल वि. वि. केदारी रेडेकर पब्लिक स्कूल (१-०, पियुष शेलार), देवाळे विद्यालय वि.वि. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) (४-०, प्रेरणा गराडे-२, दिक्षा सराटे व कल्याणी पाटील प्रत्येकी १), छत्रपती शाहू विद्यालय वि. वि. रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल (४-०, भक्ती बिरांगडी-२, अंजू देवी व सौम्या काँग्रेस प्रत्येकी १). 
मुले - महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज वि.वि. एकलव्य पब्लिक स्कूल (२-०, आदित्य लायकर, सिद्दिक नायकवडी), सेंट झेवियर्स हायस्कूल वि. वि. न्यू होरायझन स्कूल (२-०, फरहान नाईक - २), डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज वि. वि. ज्योतिर्लिंग विद्यानिकेतन (टायब्रेकर २-१), एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वि. वि. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल १-०,: संकेत जाधव).

​ ​

संबंधित बातम्या