Schoolympics : पन्हाळा विद्यामंदिरला विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 2 December 2018

कोल्हापूर - ‘सकाळ’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स व्हॉलीबॉल स्पर्धेत पन्हाळ्याच्या पन्हाळा विद्यामंदिरने आदर्श विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयावर मात करीत विजेतेपद पटकावले. नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूलने तृतीय क्रमांक मिळविला. पन्हाळा येथील पन्हाळा पब्लिक स्कूलच्या मैदानावर स्पर्धा झाली. 

अंतिम सामन्यात पन्हाळा विद्यामंदिरने आदर्श विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयाला तीन विरुद्ध एक सेटने हरविले. पन्हाळा विद्यामंदिरने पहिल्या सेटमध्ये २५-२२, दुसऱ्या १९-२५, तिसऱ्या २५-२० व चौथ्या सेटमध्ये २५-२२ गुणफरकाने बाजी मारली. तृतीय क्रमांकाच्या लढतीत नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूलने देवाळे विद्यालयाचा दोन विरुद्ध एक सेटने पराभव केला. पन्हाळा पब्लिकने देवाळे विद्यालयावर २५-२९, १२-२५, १५-६ गुणफरकाने सरशी केली. 

विजेता पन्हाळा विद्यामंदिरचा संघ असा : सूरज भोसले, पृथ्वीराज गायकवाड, प्रथमेश कदम, रौनक कदम, प्रशांत कांबळे, यश कांबळे, सौरभ खोत, अफरोज मोकाशी, सुशांत पन्हाळकर, अथर्व पोवार, मानव साठे, विनय यादव.

​ ​

संबंधित बातम्या