Schoolympics : ज्योतिर्लिंग, नरके, वारणा, घोडावत स्कूलचे विजय

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 2 December 2018

कोल्हापूर - ज्योतिर्लिंग विद्यामंदिर, डी. सी. नरके विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, महाराष्ट्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वारणा विद्यालय, एकलव्य पब्लिक स्कूलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मुलांच्या गटातील फुटबॉल स्पर्धेत मात केली. ‘सकाळ’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स ही स्पर्धा पोलो मैदानावर सुरू आहे. 

वैभव किबिलेने केलेल्या गोलच्या जोरावर ज्योतिर्लिंग विद्यामंदिरने श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमीवर विजय मिळविला. डी. सी. नरके विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयाने न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलला २-० ने हरविले. त्यांच्या प्रथमेश बाटे व प्रतीक पाटीलने गोल केला. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने (सीबीएसई) छत्रपती शाहू विद्यालयाला (सीबीएसई) ३-०ने पराभूत केले. प्रज्ञेश पाटील, आदित्य घाटगे व अर्जुन कोळेने प्रत्येकी एक गोल केला. महाराष्ट्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलला १-० ने हरविले. गंधर्व चव्हाणचा गोल निर्णायक ठरला. वारणा विद्यालयाने विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूलवर ५-० ने दणदणीत विजयाची नोंद केली. 
श्रेयस पाटीलने तीन, इंद्रनील आडनाईक व शिवराज पाटीलने प्रत्येकी एक गोल केला. प्रतीक चव्हाण व स्वप्नील पाटीलने गोल नोंदविल्याने एकलव्य पब्लिक स्कूलने न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलला २-० ने पराभूत केले. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने सेंट झेवियर्स हायस्कूलचा १-० ने पराभव केला. प्रज्ञेश पाटील विजयाचा शिल्पकार ठरला. 
वारणा विद्यालय विरुद्ध एस. एम. लोहिया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. तवनाप्पा पाटणे हायस्कूलने माघार घेतल्याने डी. सी. नरके विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयाला विजयी घोषित करण्यात आले. न्यू होरायझन स्कूल (सीबीएसई) विरुद्ध एस. एम. लोहिया हायस्कूल व कनिष्ठ 
महाविद्यालय यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. कोल्हापूर इंग्लिश स्कूलने माघार घेतल्याने सेंट झेवियर्स हायस्कूलला पुढे चाल देण्यात आली.

​ ​

संबंधित बातम्या