Schoolympics : बिशप्स प्रशालेच्या संघातच रंगणार मुलांची अंतिम लढत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 December 2018

पुणे : बिशप्स प्रशाला (कॅम्प) आणि बिशप्स को-एड प्रशाला (कल्याणीनगर) या शाळांमध्येच यंदाच्या स्कूलिंपिक्‍स फुटबॉलमधील मुलांची अंतिम लढत होईल.

एनसीएलच्या मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत बिशप्स प्रशाला, कॅम्प संघाने फुलगावच्या लोकसेवा इंग्लिश माध्यम प्रशालेचा 5-1 असा पराभव केला. बिशप्सकडून पवन ढोकरेने तीन, रोहन तेजवानी आणि ईशान चितळे यांनी एकेक गोल केला. लोकसेवा संघाचा एकमात्र गोल रिंजूने केला.
बिशप्स को-एड प्रशाला संघाने सिंबायोसिसचे आव्हान 2-0 असे सहज परतवून लावले. त्यांच्याकडून मीत जाधव आणि रोहन राजगुरू यांनी एकेक गोल केला.

बिशप्स को-एड प्रशालेच्या मुलींच्या संघानेही अंतिम फेरी गाठली. त्यांनी नियोजित वेळेतील 1-1 अशा बरोबरीनंतर सेंट मेरीज प्रशालेचा 4-2 असा पराभव केला. नियोजित वेळेत वैभवी मेद हिने बिशप्स; तर सेंट मेरीजकडून ऊर्वी साळुंका हिने गोल केला. शूटआउटमध्ये विजयी संघाकडून स्वरा पाठक, वैभवी मेद, मेलानी बोएझाल्ट यांना जाळीचा वेध घेण्यात यश आले. सेंट मेरीजकडून शूटमध्ये केवळ ऊर्वीलाच गोल करण्यात यश आले.
विजेतेपदासाठी त्यांची गाठ एंजल प्रशालेशी पडेल. त्यांनी शूटआउटमध्ये डॉ. एरीन नगरवाला बोर्डिंग प्रशालेचा 4-3 असा पराभव केला. नियोजित वेळीतील गोलशून्य बरोबरीनंतर शूटआउटमध्ये विजयी संघाकडून हर्षदा काळभोर, सुकन्या चौधरी, सेजल बहिरट, श्रुती शार्नोवर यांनी गोल केले. नगरवाला प्रशालेकडून स्नेहल नेमाणे, ज्ञानेश्‍वरी पंढारकर, सिमरन मदने यांनी जाळीचा अचूक वेध घेतला.

​ ​

संबंधित बातम्या