Schoolympics : क्रिश, विजयची चमकदार कामगिरी 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 December 2018

क्रिश शहापूरकरची फलंदाजी आणि विजय गायकवाडच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर सेठ दगडूराम कटारिया प्रशाला संघाने स्कूलिंपिक्‍स क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पुणे : क्रिश शहापूरकरची फलंदाजी आणि विजय गायकवाडच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर सेठ दगडूराम कटारिया प्रशाला संघाने स्कूलिंपिक्‍स क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी डॉ. कलमाडी शामराव प्रशालेचा 21 धावांनी पराभव केला. जे. एन. पेटिट, जय हिंद प्रशाला आणि सरदार दस्तूर प्रशाला संघांनीही उपांत्य फेरी गाठली. 

स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात क्रिशच्या 38 चेंडूंतील 69 धावांच्या खेळीने कटारिया प्रशालेने 3 बाद 106 धावा केल्या. त्याने 10 चौकार लगावले. आव्हानाचा पाठलाग करताना कलमाडी प्रशालेचा डाव 8 बाद 85 असा मर्यादित राहिला. त्यांच्याकडून साहिल श्रीवास्तवने 34, तर अनिष जगतापने 30 धावा केल्या. ही जोडी फुटल्यावर त्यांच्या आव्हानाच्या पाठलागावर मर्यादा पडल्या. कटारियाकडून विजय गायकवाडने 12 धावांत 3 गडी बाद केले. 

संक्षिप्त धावफलक : 
सिंहगड स्प्रिंगडेल, वडगाव 7 बाद 73 (मनीष शेगुंशी 18, विराज हजारा 12, पीयूष कार्डिले 2-18) पराभूत वि. जे. एन. पेटिट प्रशाला 1 बाद 74 (सार्थक वाळके नाबाद 29, साहिल नाईक नाबाद 24) 

सिटी इंटरनॅशनल स्कूल, वानवडी सर्व बाद 40 (अंकुश नाग 13, तेजस रामगाडे 3-7, अथर्व वनवे 2-6) पराभूत वि. जय हिंद प्रशाला, पिंपरी बिनबाद 43 (सूरज गोंड नाबाद 29, हिमांशू कुंदनानी नाबाद 13) 
सेठ दगडूराम कटारिया प्रशाला, गुलटेकडी 3 बाद 103 (क्रिश शहापूरकर 69, अनिकेत तन्साली 24, आयुष जगताप 2-18) वि.वि. डॉ. कलमाडी प्रशाला, एरंडवणे 8 बाद 85 (साहिल श्रीवास्तव 34, अनिष जगताप 30, विजय गायकवाड 3-12) 

सरदार दस्तूर होशांत प्रशाला, कॅम्प 3 बाद 90 (निश्‍चय नवले 38, डॅटसन डॅनिएल 30, शंतनु ढगे 15) वि.वि सिंबायोसिस प्रशाला, प्रभात रोड 5 बाद 57 (पृथ्वीराज धनकुडे 20, हृषिकेश शिंदे 12, रझ्झाक फल्ला 2-11). 
 


​ ​

संबंधित बातम्या