आर्यन आपटे, श्रेया शेडगे वेगवान धावपटू 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 December 2018

पुणे, ता. 14 : विद्या व्हॅली प्रशालेच्या आर्यन आपटे आणि सिल्व्हर क्रेस्टच्या श्रेया शेडगे यांनी स्कूलिंपिक्‍स स्पर्धेत 14 ते 16 वर्षे वयोगटात वेगवान धावपटूचा मान मिळविला. सणस मैदानावर शुक्रवारी झालेल्या शर्यतीत आर्यनने 100 मीटर शर्यत 11.04 सेकंद अशी शरस वेळ देत जिंकली. श्रेयाने चुरशीच्या लढतीत अंतिम रेषेवर महावीर प्रशालेच्या दिया सुमेरपूर हिला दशांश दोन सेकंदाने मागे टाकले. श्रेयाने 12.06 सेकंद, तर दियाने 12.08 सेकंद वेळ दिली. 

अन्य शर्यतीत फुरसुंगीच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या सिद्धेश चौधरीने 1500 मीटर आणि 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटाकावले. त्याने 1500 मीटर शर्यत 4 मिनिट 38.9 सेकंद आणि 400 मीटर शर्यत 54.02 सेकंद वेळ देत जिंकली. 

निकाल : 
14 ते 16 वर्षे 
1500 मीटर धावणे : मुले : सिद्धेश चौधरी (न्यू इंग्लिश स्कूल, फुरसुंगी, 4 मिनिट 38.9 सेकंद), ध्रुव सांडू (अभिनव विद्यालय इंग्लिश माध्यम, एरंडवणे), महेश काकड (भारतीय जैन संघटना, वाघोली), मुली : शीतल डुकरे (न्यू इंग्लिश स्कूल, फुरसुंगी, 5 मिनिट 3.7 सेकंद), श्रुती गायकवाड (सेंट जोसेफ प्रशाला, पाषाण), संजना गोसावी (सेंट मीरा सेकंडरी स्कूल, पुणे स्टेशन) 

थाळी फेक : मुले : यश शेकटकर (विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर पिंपळी, बारामती, 34.34 मीटर), यश जगताप (सेंट पॉल स्कूल, कॅम्प), आर्यन पाटील (ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी), मुली : तेजल नाईक (विद्या निकेतन इंग्लिश माध्यम स्कूल, बिबवेवाडी, 21.45 मीटर), वर्षा नऱ्हे (बालाजी इंग्लिश माध्यम स्कूल, शिरूर), शर्वाणी बर्गे (ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी) 

100 मीटर धावणे : मुले : आर्यन आपटे (विद्या व्हॅली स्कूल, सुसगांव, 11.04 सेकंद), आदित्य दळवी (सरहद स्कूल, कात्रज), आदित्य हरी (विद्या व्हॅली स्कूल, सूसगांव), मुली : श्रेया शेडगे (सिल्व्हर क्रेस्ट इंग्लिश माध्यम प्रशाला, सिंहगड रोड, 12.06 सेकंद), दिया सुमेरपूर (महावीर इंग्लिश माध्यम स्कूल, मार्केटयार्ड), अर्पिता माळी (श्री श्री रविशकंर विद्या मंदिर, भूगांव) 

लांब उडी : मुली : अप्रिता माळी (श्री श्री रविशंकर विद्या मंदिर भूगांव, 4.99 मीटर), सारा बाफना (डॉ. कलमाडी शामराव प्रशाला, एरंडवणे), रुतुगंधा घोरपडे (सिंबायोसिस प्रशाला, प्रभात रोड) 

400 मीटर धावणे मुले : सिद्धेश चौधरी (न्यू इंग्लिश स्कूल, फुरसुंगी, 54.02 सेकंद), विजय सुतार (भारतीय जैन संघटना, वाघोली), सागर भगत (केंद्रिय विद्यालय नं. 1, देहुरोड), मुली : संजना गोसावी (सेंट मीरा सेकंडरी स्कूल, पुणे स्टेशन, 1 मिनिट 2.47 सेकंद), रेवा देवकुळे (बालशिक्षण मंदिर, मयूर कॉलनी), शीतल डुकरे (न्यू इंग्लिश स्कूल, फुरसुंगी) 

​ ​

संबंधित बातम्या