Schoolympics : सातत्यपूर्ण कामगिरीसह सन्मानची चार सुवर्ण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 December 2018

रमणबाग प्रशालेच्या सन्मान गोसावी याने स्कूलिंपिक्‍स तिरंदाजी स्पर्धेचा तिसरा आणि अखेरचा दिवस गाजवताना कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीसह सुवर्णपदकांचा चौकार लगावला. 

पुणे : रमणबाग प्रशालेच्या सन्मान गोसावी याने स्कूलिंपिक्‍स तिरंदाजी स्पर्धेचा तिसरा आणि अखेरचा दिवस गाजवताना कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीसह सुवर्णपदकांचा चौकार लगावला. 

सन्मानने शुक्रवारी रिकर्व्ह 30 आणि 50 मीटर, इंडियन बो 30 आणि 50 मीटर प्रकारात ही कामगिरी केली. त्याच्या कामगिरीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने प्रत्येक सुवर्णपदक पटकाविताना तीनशेहून अधिक गुणांचा वेध घेतला. रिकर्व्ह 30 मीटरमध्ये त्याने 333, 50 मीटरमध्ये 324, इंडियन बो 30 मीटरमध्ये 308 आणि 313 गुणांची कमाई केली. 

मुलींच्या गटात पोदार प्रशालेच्या जुई ढगे हिने रिकर्व्ह 30 आणि 50 मीटर प्रकारात दोन सुवर्णपदके पटकाविली; पण इंडियन बो प्रकारातील 30 आणि 40 मीटरमध्ये राणी लक्ष्मीबाई प्रशालेच्या नमिता पासलकर, सई चव्हाण आणि राजलक्ष्मी पाटील यांच्यातच तीनही पदके विभागली गेली. फरक इतकाच, की सईला 40 आणि राजलक्ष्मीला 30 मीटरमध्ये रौप्यपदक मिळाले. दोन्ही प्रकारांतील ब्रॉंझपदके अनुक्रमे राजलक्ष्मी आणि सईलाच मिळाली.

अन्य निकाल :(पहिले तीन क्रमांक) 
14 ते 16 वर्षे रिकर्व्ह 30 मीटर :सन्मान गोसावी (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, 333), शिवम शिंदे (डॉ. कलमाडी प्रशाला, एरंडवणे, 312), आविष्कार भोसले (ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी, 309), मुली :जुई ढगे (पोदार इंटरनॅशनल प्रशाला, आंबेगाव, 284), स्वरांजली शिंदे (श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय, चिंचवड, 253), कोमल पडवळ (पोदार इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव, 238) 

रिकर्व्ह 50 मीटर :सन्मान गोसावी (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, 324), शिवम शिंदे (डॉ. कलमाडी प्रशाला, एरंडवणे, 291), आविष्कार भोसले (ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी, 271), मुली :जुई ढगे (पोदार इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव, 242), स्वरांजली शिंदे (श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय, चिंचवड, 235) 

इंडियन बो 30 मीटर :सन्मान गोसावी (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, 308), राहुल सिंग (नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी प्रशाला, फुलगाव, 281), आनंद जगताप (अभिनव एज्युकेशन सोसायटी इंग्लिश माध्यम, आंबेगाव, 280), मुली :नमिता पासलकर (246), राजलक्ष्मी पाटील (217), सई चव्हाण (तिघी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी प्रशाला, पिरंगुट, 214) 

इंडियन बो 40 मीटर :सन्मान गोसावी (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, 313), राहुल सिंह (नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी प्रशाला, 277), अजित कटखाडे (कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्रशाला, लक्ष्मीनगर, 276), मुली :नमिता पासलकर (254), सई चव्हाण (233), राजलक्ष्मी पाटील (तिघी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी प्रशाला, 211) 

कम्पाउंड 50 मीटर मुले :सौरभ वागज (श्रीमती एस. डी. गंगे प्रशाला, चिंचवड, 328), यशराज महाजन (पोदार इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव 314), ओम शिवतारे (सिंहगड स्प्रिंग डेल, एरंडवणे, 272) मुली :समीक्षा धामणकर (पोदार इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाब, 330), मैथिली शिंदे (पोदार इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव, 282), केतकी खानविलकर (राणी लक्ष्मीबाई प्रशाला, पिरंगुट, 232)  

 
 


​ ​

संबंधित बातम्या