Schoolympics 2019 : ब्लॉसम प्रशालेची दुहेरी आगेकूच 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 November 2019

स्कूलिंपिक्‍स खो-खो स्पर्धेत नऱ्हे येथील ब्लॉसम प्रशाला संघाने मुले आणि मुलींच्या गटातून आपली आगेकूच सुरू केली. मुलांच्या विभागात त्यांनी रोझलॅंड स्कूल संघाचा 14-2 असा पराभव केला.

पुणे : स्कूलिंपिक्‍स खो-खो स्पर्धेत नऱ्हे येथील ब्लॉसम प्रशाला संघाने मुले आणि मुलींच्या गटातून आपली आगेकूच सुरू केली. मुलांच्या विभागात त्यांनी रोझलॅंड स्कूल संघाचा 14-2 असा पराभव केला. त्यांच्या विजयात अभिराज संकपाळच्या भक्कम बचावाचा वाटा राहिला. मुलींच्या विभागात त्यांनी पिंपळे सौदागरच्या जीके गुरुकुल प्रशाला संघाचा 8-5 असा तीन गुणांनी पराभव केला. 

निकाल : 
मुले ः विद्यानिकेतन इंग्लिश माध्यम स्कूल (चाकण) 10 वि.वि. नवमहाराष्ट्र प्रायमरी स्कूल (धनकवडी)3, नारायणराव सणस विद्यालय (वडगाव खुर्द) 14 वि.वि. काशी विश्‍वेश्‍वर इंग्लिश माध्यम स्कूल (पिंपळे गुरव) 3, जेएसएम ब्लॉसम पब्लिक स्कूल (नऱ्हे) 14 वि.वि. रोझलॅंड स्कूल (गोकुळनगर) 2, धनीराज स्कूल (बावधन) 14 वि.वि. समर्थ विद्यालय (धनकवडी) 1, वर्धमान इंग्लिश माध्यम स्कूल (हडपसर) 10 वि.वि. कै. श्री माधवराव भिडे संस्कार गुरुकुल स्कूल (सिंहगड रोड) 4, वॉल्नट स्कूल (शिवणे) 14 वि.वि. डॅफोडिल इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी) 4, सिग्नेट पब्लिक स्कूल (नऱ्हे) 9 वि.वि. संस्कृती नॅशनल स्कूल (उत्तमनगर) 1, मिलेनियम नॅशनल स्कूल (कर्वेनगर) 5 वि.वि. जवाहरलाल इंग्लिश स्कूल (महर्षिनगर) 0 

मुली ः पेरिविंकल इंग्लिश माध्यम स्कूल (बावधन) 19 वि.वि. विद्या व्हॅली निकेतन इंग्लिश माध्यम स्कूल (वाकड) 1, माऊंट मेरी स्कूल (ससाणेनगर) 15 वि.वि. रोझलॅंड स्कूल (गोकुळनगर) 13, श्री वामनराव ओतुरकर माध्यमिक विद्यालय (धनकवडी) 9 वि.वि. साने गुरुजी प्रायमरी स्कूल (हडपसर) 4, जेएसपीएम ब्लॉसम प्रशाला (नऱ्हे) 8 वि.वि. जीके गुरुकुल (पिंपळे सौदागर) 5, न्यू इंग्लिश स्कूल (फुरसुंगी) 17 वि.वि. पीएमसी अहिल्यादेवी होळकर इंग्लिश माध्यम स्कूल (चव्हाणनगर औंध) 0, प्रेरणा विद्यालय (आंबेगाव) 12 वि.वि. विद्यानिकेतन इंग्लिश माध्यम स्कूल (चाकण) 6, फ्लाइंग बर्डस स्कूल (आंबेगाव बु.) 5 वि.वि. समर्थ विद्यालय (धनकवडी) 1.


​ ​

संबंधित बातम्या