शालेय क्रीडा स्पर्धेतील खेळ खंडोबा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 September 2018

स्पर्धा संयोजनात क्रीडाशिक्षक प्रतिनिधी असणे आवश्यक
तालुका स्तरावर 3/5 तर जिल्हा स्तरावर 5/7 प्रतिनिधी आयोजन समितीत असणे आवश्यक आहे ज्यामुळे आयोजन सुलभता व message convey करणे सोपे जाईल तसेच क्रीडा शिक्षकांच्या प्रत्यक्ष अडचणी लक्षात येतील. एकीकडे सध्या देशात शालेय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्याकरिता खेलो इंडिया चे आयोजन केले जाते तर दुसरीकडे स्पर्धा उरकल्या जात आहेत. क्रीडा स्पर्धेतील नियोजन आणि प्रशासकीय धोरण यातील काहीतरी मधला मार्ग काढलाच पाहिजे. गरज आहे ती फक्त यातील तफावत दूर करण्याचीच..या प्रश्नाकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देऊन पावले उचलावीत एवढीच अपेक्षा. 

जिल्हा क्रीडा परिषद आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या विविध खेळांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा सुरू आहेत.या स्पर्धेचे नियोजन दरवर्षी प्रमाणे पुण्यात पुणे महानगरपालिका करत असते.

जिल्हा क्रीडा परिषदेच्या अंतर्गत पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण अशा तीन विभागात या  स्पर्धेचे आयोजन केले जाते.या स्पर्धेवर जिव्हा क्रीडाअधिकारी कार्यालयाचे नियंत्रण असते. गेल्या वर्षी पासून या स्पर्धेकरिता शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनाआँन लाईन प्रवेश प्रक्रिया बंधनकारक केले आहे. शालेय क्रीडा स्पर्धेकरिता शालेय गटात -14 वर्षा खाली मुले आणि मुली आणि , 17 वर्षाखालील मुले आणि मुली हे खेळू शकतात तर कनिष्ठ महाविद्यालयांना 19 वर्षाखालील मुले आणि मुली असा वयोगट असतो.

असेच काहीसे या वर्षीच्या जिल्हा क्रीडा परिषदेच्याअंतर्गत पुणे शहर गटातील स्पर्धेत झालेले दिसुन येत आहे. महानगरपालिका च्या वतीने घेण्यात येणा-या सर्व स्पर्धेचे नियोजन करताना अकरावी आँन लाईन प्रवेश प्रक्रिया लक्षात न घेता केल्यामुळेआज 19 वर्षाखालील वयोगट पुर्णपणे भरडला गेला आहे. अकरावीला प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाल्याशिवाय जिल्हा क्रीडा परिषदेच्या स्पर्धा खेळता येत नाहीत.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया- 
कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर आजही प्रवेश प्रक्रिया चालू आहे ज्या खेळाडूंचे प्रवेश अजूनही निश्चित झालेले नाहीत किंवा उशिरा झालेले आहेत त्यांना ऑनलाइन अर्ज भरणे अशक्य होते किंवा त्यांच्या स्पर्धा होऊन गेलेल्या असतात यामध्ये एखादा राष्ट्रीय खेळाडूही भरडला जाऊ शकतो.कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची खबरदारी जिल्हाक्रीडा अधिकारी कार्यालय आणि पुणे महानगरपालिका या दोघांवर होती आयोजकांनी घ्यायला पाहिजे होती.

खेळाडू हा या स्पर्धेचा केंद्रबिंदू 
खेळाडू हा या स्पर्धेचा केंद्रबिंदू असला पाहिजे पण आपल्याकडे अजुनही खेळाडूला पण काही अडचणी येत असतील हे समजुन घेतले जात नाही. खेळाडूला खेळणयाकरिता मैदाने उपलब्ध नाहीत. शासनाच्या वतीने काही ठराविक ठिकाणी आणि ठराविक खेळासाठी क्रीडा संकुले आहेत. तरीही आजचा खेळाडू संघर्ष करतच खेळण्याची धडपड करत असतो.अशा अनेक समस्यांना तोंड देत खेळाडू स्वतःला स्पर्धेकरिता तयार करत असतो त्यासाठीच वर्षानुवर्षं मेहनत करत असतो. एवढे सर्व अडथळे पार करून तो स्पर्धेसाठी सज्ज होतो तेव्हा जर खेळाडूचा अकरावी प्रवेश उशीरा झाल्यामुळे जर स्पर्धेत खेळताच आले नाही तर दोष कोणाचा?

तसेच पिंपरी चिंचवड येथील असेच सुरू आहे.इथे ब-याच स्पर्धा एकाच दिवशी आल्यामुळे तसेच येत्या रविवारीच नेव्ही ची परिक्षा 12वी सायन्सच्याच मुलाकंरिता आहे.तयाच दिवशी बाँल बँडमिटन व रोलबाँल या स्पर्धा आहेत.या स्पर्धेच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी देखील अनेक शिक्षकांच्या वतीने करण्यात आली होती .  तसेच तायकवादो kick boxing  आणि कबड्डी हे पण एकाच दिवशी आहेत.काही खेळाडू हे जर दोन्ही खेळात  भाग घेत असतील तर त्यांना एकाच खेळात भाग घ्यावा लागेल.

आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी  पिंपरी चिंचवड येथील स्पर्धेत  14 वर्षे वयोगटातील सहा खेळाच्या स्पर्धा सुरू झाल्या उद्या 17  वर्षाखालील आणि परवा 19 वर्षाखालील करणार आहेत. दिनांक 8 सप्टेंबरला एका च दिवशी 19  वर्षाखालील वयोगटाचे जुदो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कब्बडी तायकांदो या चार खेळांची स्पर्धा पण एकाच दिवशी घेण्यात येणार आहे आहेत.

क्रीडास्पर्धा आयोजनातील नियोजन 
तालुका जिल्हा स्तरावरचे आयोजन हे विभाग राज्य राष्ट्रीय स्पर्धा यांच्या  तारखा लक्षात घेऊनच केले पाहिजे.केवळ स्पर्धा उरकणे असा हेतू नसावा.त्यामुळे खेळाडूचे नुकसान होते. विभागस्तर जर दोन महिने पुढे असले तर स्थानिक स्तरावर खेळाडूला सराव (practice) करण्यास वेळ दिला जावा. मागील तीन वर्षांपासून ते शेड्युल मागील तीन वर्षांपासून ते शेड्युल आहे, स्पोर्ट कॅलेंडर मधील तारखा सुद्धा बदलेल्या नाहीतआहे, स्पोर्ट कॅलेंडर मधील तारखा सुद्धा बदलेल्या नाहीत. एक महिना शेड्युल तयार असताना सुद्धा ज्या स्पर्धा एकत्र येतात त्याचे बदल करण्याचे नियोजन केले जात नाही.

नुकत्याच दिनांक 23 ते 25 आँगसट रोजी पुणे महानगरपालिका आणि जिल्हाक्रीडा परिषदेच्या वतीने  जिल्हा जलतरण स्पर्धा आयोजित केली गेली होती. अकरावीतील खेळाडूचे प्रवेश त्या वेळी झालेले नव्हते. एवढ्या लवकर ही स्पर्धा उरकल्या गेली आहे.कारण या स्पर्धेच्या विभाग किंवा राज्य जलतरण च्या तारखा अजुनही निश्चीत नाहीत आणि राष्ट्रीय पातळीवरील 19 वर्ष वयोगटातील स्पर्धा दिल्ली येथे जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत. मग आपल्या जिल्हा जलतरण स्पर्धा एवढया लवकर आयोजित करण्याची घाई कशासाठी?

एका तारखेला एकच स्पर्धा असावी सध्या पाच /सात स्पर्धा एकाच वेळी आयोजित केल्या जातात त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर असणाऱ्या एकमेव शारीरिक शिक्षकाची सर्कस होते आणि यात जर एखादा खेळाडू जायबंदी झाला तर शाळाप्रशासनासह सगळेच त्याची जबाबदारी संबंधित शिक्षकावर ढकलतात. खरं तर खेळाडूंना स्पर्धेला घेऊन जाणे असा ही जबाबदारी क्रीडा शिक्षकाची आहे असा कुठेही लेखाजोखा नाही पण ही जबाबदारी आमचा शिक्षक प्रामाणिकपणे पार पाडत असतो  स्पर्धा स्थळे ही 20/25 किलोमीटर अंतरावर असतात ग्रामीण भागात तर हे अंतर 50 किलोमीटर वरती असते आणि स्पर्धेची तारीख एकाच दिवशी असते.

स्पर्धा संयोजनात क्रीडाशिक्षक प्रतिनिधी असणे आवश्यक
तालुका स्तरावर 3/5 तर जिल्हा स्तरावर 5/7 प्रतिनिधी आयोजन समितीत असणे आवश्यक आहे ज्यामुळे आयोजन सुलभता व message convey करणे सोपे जाईल तसेच क्रीडा शिक्षकांच्या प्रत्यक्ष अडचणी लक्षात येतील. एकीकडे सध्या देशात शालेय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्याकरिता खेलो इंडिया चे आयोजन केले जाते तर दुसरीकडे स्पर्धा उरकल्या जात आहेत. क्रीडा स्पर्धेतील नियोजन आणि प्रशासकीय धोरण यातील काहीतरी मधला मार्ग काढलाच पाहिजे. गरज आहे ती फक्त यातील तफावत दूर करण्याचीच..या प्रश्नाकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देऊन पावले उचलावीत एवढीच अपेक्षा. 


​ ​

संबंधित बातम्या