जलतरण स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विजेते

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 November 2019

- आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत मुलींच्या विभागात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले

-  पुणे विद्यापीठाने सहा सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन ब्रॉंझ अशी एकूण 13 पदके मिळवून हे यश मिळविले.

पुणे ः आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत मुलींच्या विभागात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. पुणे विद्यापीठाने सहा सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन ब्रॉंझ अशी एकूण 13 पदके मिळवून हे यश मिळविले. पुण्याचीच साध्वी धुरी हिने 100 मीटर फ्री-स्टाईल, 200 मीटर वैयक्तिक मिडले, 50 मीटर फ्री-स्टाईल प्रकारात सुवर्ण, तर 100 आणि 50 मीट बटरफ्लाय, 200 मीटर फ्री-स्टाईल प्रकारात रौप्य अशी सहा पदकांची कमाई केली. तिलाच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले. युगा बिरनाळे हिने 50 आणि 200 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्ण, तर 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात रौप्यपदक मिळविले. आर्या राजू हिने 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण, तर 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात ब्रॉंझपदकाची कमाई केली. स्पर्धेतील 100 मीटर फ्री-स्टाईल रिले शर्यतीत पुणे विद्यापीठाने ब्रॉंझ, तर 100 मीट वैयक्तिक मिडले प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. ही स्पर्धा जालंधर येथे लव्हली प्रोफेशनल युनिर्व्हसिटीने 6 ते 8 नोव्हेंबर रोजी आयोजित केली होती.  


​ ​

संबंधित बातम्या