सौरभ चौधरीची जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी

वृत्तसंस्था
Thursday, 6 September 2018

नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या सौरभ चौधरीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले आहे. 

चॅंगवॉन : नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या सौरभ चौधरीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले आहे. 

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल मुलांच्या कनिष्ठ गटात सौरभने 245.5 गुणांची कमाई करत विश्वविक्रमाची नोंद केली. याच गटात भारताच्या अर्जुनसिंग चिमाने 218 गुण कमावत ब्रॉंझ पदक पटकावले तर कोरियाच्या होजीन लिमाला याने 243.1 गुण कमावत रौप्य पदक पटकावले. 

सौरभने जर्मनीमध्ये झालेल्या कनिष्ठ मुलांच्या विश्वकरंडकात 243.7 गुणासंह सुवर्णपदक जिंकले होते. या गुणासंह त्याने विश्वविक्रम रचला होता. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने 245.5 गुणांची कमाई करत स्वत:चाच विक्रम मोडला आहे. सौरभने भारतासाठी मिळवलेले हे दहावे सुवर्ण पदक आहे. तसेच सौरभ चौधरी, अर्जुनसिंग चिमा आणि अनमोल जैन यांनी सांघित प्रकारात 1730 गुणांसह सुवर्ण पदक पटकावले.  


​ ​

संबंधित बातम्या