भारत्तोलनमध्ये सौम्याने सुवर्ण; साक्षीने रौप्य पदक पटकावले

शशिकांत जामगडे
Tuesday, 9 July 2019

श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : आफ्रिका खंडातील सामोआ देशात सुरू असलेल्या वेटलिफ्टिंग ज्युनिअर कॉमनवेल्थ स्पर्धेत सौम्या दळवी हिने सुवर्णपदक तर पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील साक्षी मस्के हिने सिल्वर पदक पटकावून महाराष्ट्रसह देशाची मान उंचावण्याची कामगिरी केली आहे.

श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : आफ्रिका खंडातील सामोआ देशात सुरू असलेल्या वेटलिफ्टिंग ज्युनिअर कॉमनवेल्थ स्पर्धेत सौम्या दळवी हिने सुवर्णपदक तर पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील साक्षी मस्के हिने सिल्वर पदक पटकावून महाराष्ट्रसह देशाची मान उंचावण्याची कामगिरी केली आहे.

भारतीय भारत्तोलन संघाद्वारे पंजाब मधील पटियाला येथे घेण्यात आलेल्या सराव शिबिरात 40 किलो युवा गटामधून सौम्या दळवी हिने तर श्रीरामपूर येथील साक्षी प्रकाश म्हस्के हिने 45 किलो वजनी गटात उत्कृष्ट प्रदर्शन करून आफ्रिका खंडातील सामोआ देशात होऊ घातलेल्या होऊ घातलेल्या वेटलिफ्टिंग ज्युनिअर कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा करून दिला होता.सामोआ देशात 8 ते 14 जुलै दरम्यान सुरु असलेल्या वेटलिफ्टिंग ज्युनिअर कॉमनवेल्थ स्पर्धेत सौम्या दळवी हिने 40 किलो वजनी गटात सूवर्णपदक तर साक्षी मस्के हिने 45 किलो वजनी गटात खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करुन सिल्व्हर पदक पटकावून महाराष्ट्रासह देशाची मान उंचावण्याची कामगिरी केली आहे. साक्षीने दोन किलो वजन कमी उचलल्यामुळे तिला सुवर्ण पदकाऐवजी सिल्व्हर पदकावर समाधान मानावे लागले.

विशेष म्हणजे साक्षी मस्केची घरची परिस्थिती बेताची  असून जिद्द,चिकाटी व कठोर परिश्रमाच्या बळावर तिने  हे यश संपादन केले आहे. यापूर्वी तिने महापौर चषक राष्ट्रीय युवा व ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून  राष्ट्रीय स्तरावर आपले नाव कोरले होते मुलांचे वर्चस्व असणाऱ्या वेटलिफ्टिंग सारख्या खेळात मुलगी असलेल्या साक्षीने उत्कृष्ट कामगिरी करून देशाला पदक मिळवून दिल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिला पुणे येथील वेटलिफ्टिंग च्या कोच उज्वला माने तसेच पुसद येथील क्रीडा शिक्षक सुनील देशमुख,अविनाश कराळे, आनंद करडे, रोशन देशमुख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल श्रीरामपूरवासियांनी आनंद व्यक्त केला असून तिची ऑलिंपिक स्पर्धे साठी निवड होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


​ ​

संबंधित बातम्या