World Cup 2019 : आज 500 करतो आणि जिंकतोच बघा

वृत्तसंस्था
Friday, 5 July 2019

पाकिस्तानच्या संघाला आता उपांत्य फेरी गाठणे जवळपास अशक्य आहे. मात्र, त्यांचा कर्णधार सर्फराज अहमदने 500 धावा करण्याचा विश्वास दाखवला आहे. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : पाकिस्तानच्या संघाला आता उपांत्य फेरी गाठणे जवळपास अशक्य आहे. मात्र, त्यांचा कर्णधार सर्फराज अहमदने 500 धावा करण्याचा विश्वास दाखवला आहे. 

''बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून आम्ही 500 धावा करण्याचा प्रयत्न करु. विडिंजविरुद्ध आम्हाला धावगती वाढविता आली नाही. पण बांगलादेशविरुद्ध आम्ही 500 धावा करण्याचा प्रयत्न करू. आमच्या नशीबात चमत्कार लिहला असेल तर शुक्रवारी नक्कीच तो होईल,'' असे सर्फराज म्हणाला.
 
बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी आता त्यांना किमान 350 धावा करुन 312 धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. असे झाले तर त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळू शकतो. 

यासाठी त्यांना बांगलादेशविरुद्ध 350 धावा करुन त्यांच्या पूर्ण संघ 38 धावांत बाद करणे गरजेचे आहे. पाकने या सामन्यात प्रथमच फलंदाजी करणे गरजेचे आहे. त्यांनी दुसऱअयांदा फलंदाजी केली तर त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. पाकिस्तानचा संघ सध्या नऊ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.


​ ​

संबंधित बातम्या