बीसीसीआयने धोनीला योग्य वागणूक दिली नाही ; वाचा सविस्तर 

टीम ई-सकाळ
Sunday, 23 August 2020

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी धोनीने आपल्या आवडत्या  गाण्यासोबत सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम वरून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. धोनीच्या या निर्णयानंतर क्रिकेट जगतासह सर्वांनाच मोठा धक्का बसला. क्रिकेट मधील अनेकांनी धोनीच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी धोनीच्या फेअरवेल सामन्याची मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) केली आहे. त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू सकलैन मुश्ताकने देखील अशीच मागणी केली असून, बीसीसीआयने धोनीला 'योग्य मार्गाने' वागवले नसल्याचे म्हटले आहे. 

शतकांनी हुलकावणी दिलेला भारताचा सलामीवीर काळाच्या पडद्याआड 

संपूर्ण क्रिकेट जगतात इतिहास घडवणाऱ्या धोनीच्या निवृत्तीने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण यापूर्वी प्रत्येकजण त्याच्या संस्मरणीय विदाईच्या सामन्याची वाट पाहत होता. त्यानंतर अनेकांनी धोनीच्या फेअरवेल सामन्याबाबत चर्चा करण्यास सुरवात केली होती. या मध्ये आता पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू सकलैन मुश्ताक देखील सामील झाला आहे. सकलैन मुश्ताकने आपल्या यूट्यूब वाहिनीवर धोनीच्या निवृत्तीविषयी बोलताना, बीसीसीआयला धोनीसाठी फेअरवेल सामना आयोजित करता आला नसल्याने हा एक प्रकारे बीसीसीआयचाच पराभव असल्याचे म्हटले आहे. याशिवाय धोनीसारख्या मोठ्या खेळाडूला बीसीसीआयने योग्य वागणूक दिली नसल्याचा दावा देखील सकलैन मुश्ताकने केला आहे. 

धोनीच्या निवृत्तीनंतर न्यूज चॅनलने लावला भलत्याच 'युवराज सिंग'ला फोन; VIDEO VIRAL  

तसेच, आपण नेहमीच सकारात्मक गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचे सकलैन मुश्ताकने यावेळी नमूद करत, मात्र धोनीला बीसीसीआयने योग्य वागणूक दिली असती तर, त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून सेवानिवृत्ती अशा प्रकारची झाली नसती, असे सकलैन मुश्ताकने सांगितले. व धोनीच्या निवृत्तीनंतर त्याच्यासाठी फेअरवेल सामना झाला नसल्याने खेद वाटत असल्याचे म्हणून, अशीच भावना त्याच्या लाखो चाहत्यांना देखील वाटत असल्याचा दावा सकलैन मुश्ताकने केला आहे. मात्र, आयपीएलमध्ये धोनी खेळताना दिसणार असल्याने याचा आनंद असल्याचे सकलैन मुश्ताकने यावेळेस म्हटले आहे. 

लुकाकूच्या आत्मघाती गोलमुळे युरोपा लीगमध्ये सेविलाची खिताबावर मोहर   

दरम्यान, महेंद्रसिंग धोनी आयसीसीच्या सर्व प्रकारांमधील विजेतेपदं मिळवून देणारा जगातील एकमेव कर्णधार आहे. भारताच्या या खेळाडूने आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दही चांगलीच गाजवली आहे. धोनीने अनेक विक्रमांची नोंद केली आहे. 2007 मध्ये टी-20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवत पहिला टी-20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपदही त्याने आपल्या हटक्या स्टाईलनेच भूषविले.             


​ ​

संबंधित बातम्या